ठाणे - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात आता ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण झाली ( Thane Municipality Commissioner Tested Covid Positive ) आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ( Thane Corona Update ) वाढ होत असताना दिसून येत असून दुप्पट वेगाने कोरोनाची लागण होत असताना आकडे समोर येत आहेत. त्यातच ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनाही कोरोनाची लागण झाली असून गृह विलगीकरणात असलेल्या आयुक्तवर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी विपीन शर्मा यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत आयुक्त विपीन शर्मा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साधणार लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी रविवारी (दि. 2 जानेवारी) कोरोनाची चाचणी केली होती. त्यांना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अनेक ठिकाणी लावली होती हजेरी
मागील काही दिवसांपासून आयुक्त शर्मा यांनी अनेक बैठकांना उपस्थित होते. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शुभेच्छा देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विपीन शर्मा उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्याही संपर्कात होते. तसेच काही दिवसांपूर्वी पालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्या सोबत बैठकांत त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - Ambernath Gang Rape : अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक