ETV Bharat / city

Tempo Crushes Little boy In Thane : टेम्पो चालकाने १४ महिन्यांच्या मुलाला चिरडले; घटना सीसीटीव्हीत कैद - Tempo driver crushes 14-month-old boy

ठाण्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन मुलं मैदानात खेळत असताना भरधाव टेम्पो चालकाने १४ महिन्यांच्या मुलाला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Tempo Crushes Little boy In Thane) याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून टोम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. सैफ फारुखी असे टेम्पो चालकाचे नाव आहे. तर, अरसलाम शहा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टेम्पो चालकाने १४ महिन्यांच्या मुलाला चिरडले; घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Mar 29, 2022, 5:13 PM IST

ठाणे - टिटवाळा नजीक बल्याणी परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन मुलं मैदानात खेळत असताना भरधाव टेम्पो चालकाने १४ महिन्यांच्या मुलाला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून टोम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. सैफ फारुखी असे टेम्पो चालकाचे नाव आहे. तर, अरसलाम शहा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (Tempo Crushes Little boy) या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हिडिओ

मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू - टिटवाळा नजीक बल्याणी परिसरात असलेल्या रहीसा चाळजवळ एका मार्बल दुकानात (२४ मार्च)रोजी सकाळच्या सुमारास एका टेम्पो मारबल घेऊन आला होता. त्यानंतर टेम्पो बाहेर पडताना परिसरातील तीन मुलं खेळत होती. त्यावेळी खेळणाऱ्या १४ महिन्याच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत या त्या मुलाचा उपचारादरम्यान त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २४ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.

धडक देऊन टेम्पो खाली चिरडल्याचे दिसून येते - घटनेची माहिती कल्याण तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करत टेम्पोचालक सैफ फारुखीला अटक केली होती. मात्र, न्यायालयामध्ये हजर केले असता सैफ फारुखीला जामीन मंजूर करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या दिवसाच्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी टेम्पो चालक सौफ हा टेम्पो जाणीवपूर्वक त्या चिमुरड्याला धडक देऊन टेम्पो खाली चिरडल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून आरोपी टेम्पो चालकावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा - २५ वर्षीय तरुणीशी लग्न करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या.. सोशल मीडियावर झाला होता व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.