ठाणे : ठाणे जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने ठाण्यात
टीडीआरएफ म्हणजेच ठाणे जिल्हा रेस्क्यू फॉर्स ही पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. टीमने आतापर्यंत शेकडो लोकांचे प्राण वाचवले. हीच टीडीआरएफची टीम पावसाळ्यापूर्वी सज्ज झाली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व साधनांसह ठाण्यात तैनात झालेली आहे.
टीडीआरएफचे कार्य : आतापर्यंत अनेकदा एनडीआरएफच्या आधी पोहचून लोकांचे जीव वाचवण्याचे काम या टीडीआरएफने केले आहे. 33 जणांच्या ह्या टीमने आतापर्यंत 130 कॉल्स मधे काम केले आहे. त्यात महालक्ष्मी एक्स्प्रेसमधल्या 11 प्रवाशांना एनडीआरएफ येण्याआधी सुखरूप बाहेर काढले होते. भिवंडी येथील इमारत दुर्घटनावेळी 25 जणांना जीवदान दिले होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तळई दरड कोसळ्ल्यावर सर्वात आधी पोहचून तेथे बाचाव कार्य सुरू केले होते.
अनेकदा मिळाली शाबासकीची थाप : महाड येथील तळई या गावातील दरड कोसळण्याच्या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व टीमचे कौतुक केले होते. ठाण्याच्या या टीडीआरएफ टीमने केलेल्या विविध रेस्क्यू ऑपरेशनमुळे अनेकांचे प्राण वाचले. शिवाय झालेल्या मदतीबद्दल त्यांचा अनेकदा गौरवदेखील करण्यात आलेला आहे. महाडमधील दरड कोसळल्यानंतर केलेल्या बचाव कार्यबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.
सर्व प्रकारची साधन सामग्री उपलब्ध : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री टीडीआरएफकडे उपलब्ध आहे. पावसाळ्यात या सर्व साधनांना वापरण्यात येते, त्यामुळे याची देखभाल होणेदेखील गरजेचे असते.
टीडीआरएफ जवानांची खंत : खुद्द मुख्यमंत्र्यांनी कामाचे कौतुक करून शाबासकीची थापदेखील दिली होती. त्या वेळेस तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी झाले आहात, अशी घोषणादेखील केली होती. मात्र, आजतागायत कोणत्याही प्रकारे राज्य सरकारचे कर्मचारी होऊ शकलेले नाहीत त्यांची फाईल ही सरकार दरबारी अजूनही धूळ खात पडलेली आहे.
ठाण्यात पावसाळा त्रासदायक : आतापर्यंतचा इतिहास पहिला, तर ठाण्यात पावसाळ्यात अनेक दुर्घटना पाहायला मिळतात कारण मुसळधार पाऊस आणि खाडी किनारा यामुळे धोकादायक इमारती आणि धोकादायक वृक्ष यामुळे प्रत्येक पावसात दुर्घटना होत असतात. त्यामुळे आपत्ती टीम आणि टीडीआरएफचे ठाण्यात विशेश महत्व आहे.
हेही वाचा : टीडीआरएफच्या जवानांना पूर परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण, ठाणे मनपाचा उपक्रम