ETV Bharat / city

डोंबिवलीतही झळकले संजय राऊतांच्या समर्थनाचे बॅनर - Dombivali Shivsena news

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसबाहेर बॅनर लावले होते. त्यापाठोपाठ डोंबिवली स्टेशन परिसरातील चौका-चौकांत शिवसेना नेते संजय खासदार संजय राऊत यांच्या समर्थनाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

संजय राऊत यांचे बॅनर
संजय राऊत यांचे बॅनर
author img

By

Published : Dec 29, 2020, 9:34 PM IST

ठाणे- शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेल्या नोटीसनंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. मुंबईत ईडी कार्यालयावर बॅनर लावल्यानंतर डोंबिवलीतही ठिकठिकाणी खासदार संजय राऊत यांच्या समर्थनाचे बॅनर झळकलेले दिसत आहेत.

ईडीने खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवल्याने शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. शिवसैनिक आणि सेना पदाधिकारी ईडीच्या नोटीसनंतर आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसबाहेर बॅनर लावले होते. त्यापाठोपाठ डोंबिवली स्टेशन परिसरातील चौका-चौकांत शिवसेना नेते संजय खासदार संजय राऊत यांच्या समर्थनाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढवत इशाराही दिला. राऊत यांच्या याच वक्तव्याचा दाखला देत त्यांच्या विधानाचे बॅनर डोंबिवलीत झळकलेले दिसत आहेत.

दरम्यान, ईडीने यापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावली होती.

हेही वाचा-वर्षा राऊत ५ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होणार

संजय राऊत यांनी विरोधकांवर केली होती टीका

'आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं, ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. आम्ही शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही,' असा हल्लाबोल संजय राऊत यांनी विरोधकांवर २८ डिसेंबरला केला. 'ईडीला काही काम राहिलेले दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचे विरोधकांचा मानसिक छळ करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे दिसत आहे. त्यांनाही काही काम हवे. त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचे काम करावे लागत आहे. मला ईडीची कीव येते', असे राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा-हम भी नही कुछ कम', रामदास आठवले यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.