ठाणे :- दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह (Thane 7 Corona negative report) आली आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून ७ जण ठाण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने महापलिकेला प्राप्त झाली होती. याच अनुषंगाने ठाणे महापलिकेच्या (Thane Muncipal Corporation) आरोग्य विभागाकडून धावपळ सुरू झाली होती. दरम्यान त्याची शोधमोहीम हाती घेण्यात आल्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन व ठाणे मनपा प्रशासनाला दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात ७ प्रवाशी आले होते. त्यापैकी २ जणांना ठाण्यात येऊन १४ दिवसांचा कालावधी लोटला होता. त्यामुळे धोका टळला होता. मात्र, तर इतर ५ जणांची ठाणे महापालिकेने कोरोना चाचणी करुन त्यांचे नमुने जिनोम सिक्वेसींगसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान रात्री उशिरा या ५ जणांची कोरोना चाचणीचे रिपोर्ट आले होते. या पाचही जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व प्रवाशांनी प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशांचा पालिकेकडून शोध सुरू