ETV Bharat / city

Dombivli Rikshaw Driver Beaten : दुचाकीला मारला कट, डोंबिवलीत रिक्षाचालकाला भर रस्त्यात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Dec 17, 2021, 1:12 PM IST

रस्त्याने जात असताना दुचाकीला कट मारल्याच्या रागातून एकाने त्याच्या १० ते १५ साथीदारांसह मिळून रिक्षा चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बेदम मारहाण ( Dombivli Rikshaw Driver Beaten ) केली. ही घटना डोंबिवली पूर्व भागात ( Beaten To Death With Revolver Threat ) घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण झाले होते. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद
घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे : डोंबिवली पूर्वेतील एका रिक्षा चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला कट मारला. त्यात झालेल्या वादातून दुचाकी चालक व त्याच्या १० ते १५ साथीदारांनी रिक्षा चालकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ( Beaten To Death With Revolver Threat ) भर रस्त्यात बेदम मारहाण ( Dombivli Rikshaw Driver Beaten ) केली. या मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( Incident Captured On CCTV ) झाला आहे.

दुचाकीला मारला कट, डोंबिवलीत रिक्षाचालकाला भर रस्त्यात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

रिव्हॉल्व्हर लोड करतांना गोळी पडली खाली

खळबळजनक बाब म्हणजे, एक आरोपी हा रिव्हॉल्व्हर लोड करत असतांना रिव्हॉल्व्हरमधून गोळी खाली पडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात ( Dombivli Police Station ) गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तर काही आरोपींचा शोध सुरु आहे. सिद्धार्थ मोरे, अमोल केदार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवाय आरोपीकडून रिव्हॉल्व्हर ही जप्त करण्यात आले.

अन् 'तो' टोळक्याच्या हल्ल्यापासून बचावला

राजेश भालेराव हा रिक्षाचालक डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी झोपड्पट्टीत ( Indira Gandhi Zopadpatti Dombivli ) राहतो. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी सिद्धार्थ हा दुचाकीवरून घरडा सर्कल ते शेलार नाका रस्त्याने जात होता. त्यावेळी राजेश भालेराव या रिक्षाचालकाने त्याच्या दुचाकीला कट मारला. याचा राग मनात धरून आरोपी सिद्धार्थचा मित्र अमोल केदार याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने रिक्षाचालक राजेश भालेरावला रस्त्यातच बेदम मारहाण केली. आरोपीचे टोळके मारहाण करत असताना घटनास्थळाहून रिक्षाचालने पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. त्यामुळे तो टोळक्याच्या हल्ल्यापासून बचावला.

मारहाणीनंतरही टोळक्याने माजवली दहशत

रिक्षाचालक आपल्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे पाहून मारेकरी एवढ्यावरच थांबले नाहीत. रिक्षाचालकाला मारहाण केल्यानंतर शेलार नाका परिसरामध्ये आरोपी अमोल केदार आणि त्याच्या 10 ते 15 साथीदारांनी दहशत माजवली. अमोल केदार याने स्वतःजवळ असलेली रिव्हॉल्व्हर लोड करून दहशत माजवत असतांना, रिव्हॉल्व्हरची गोळी खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता, पोलिसांना रिव्हॉल्व्हरची गोळी आढळून आली. याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, अन्य साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.