ठाणे - जिल्ह्यामध्ये तंबाखू व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. सदर आदेश 18 मार्चपासून तात्काळ लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.