ठाणे - कोरोनाचा प्रदुभाव वाढत असताना लग्न समारंभ साखरपुडा या कार्यक्रमावर निर्बंध आले आहेत, पण या वातावरणात देखील विवाह होत आहेत. मागील चार महिन्यापासून लग्नावर निर्बंध आल्याने काही लोक लग्न समारंभ पुढे ढकलत आहेत. पण अनेक लोक या काळात खर्च कमी करून साधेपणात लग्न करत आहेत. या कमी पैशात होणाऱ्या लग्नाचा खर्च वाचवून त्यांचा फायदा भविष्यासाठी करण्याचा देखील मानस वक्त होत आहेत.
एकिकडे लॉकडाऊन, आर्थिक अडचणी अशा काळात नागरिक सरकारी नियमाचे पालन करत मोजक्याच लोकांच्या साक्षीने लग्न पार पाडत आहेत. पण अशाच वेळेचा फायदा ही अनेकांना होत आहे. सरकारी विवाह नोंदणी कार्यालयात देखील सोशल डिस्टन्स पाळून विवाह होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कुठल्याही प्रकारची गर्दी न करत अनेक जोडप्यानी थाटामाटात वरात काढून जाण्यापेक्षा दुचाकीवरून घरी जाणे देखील पसंत केले आहे. तसेच थाटामाटात लग्न न करता उरलेल्या पैश्याचा भविष्यात संसारासाठी सदुपयोग करण्याचे ठरविले आहे.

गेल्या चार महिण्यापासून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सरकारी कार्यालयात देखील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमीच आहे. त्यातच गेल्या सहा महिण्यापासून लग्न ठरून देखील लग्न न झालेल्या जोडप्यांनी आता एक नवीन शक्कल लढविली आहे. त्यातच डोंबिवली येथे राहणाऱ्या शरंजुले आणि जाधव कुटुंबीयांनी आज साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स पाळून विवाह केला आहे. तर त्यांच्या नातेवाईकांनी देखील त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे. तसेच उरलेल्या पैश्याचा सदुपयोग करणार असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही दाम्पत्यांनी एक वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे. अनेकांच्या थाटामाटात लग्नाचे मनसुबे असतील ही पण त्यासाठी त्यांना आणखी वेळ वाट पाहवी लागणार आहे. पण या संधीचे आपल्या भविष्यासाठी उपयोग करणारे या काळात आनंदी आहेत हे नक्की.


