ठाणे - काल झालेल्या मुसळधार पावसात माध्यरेल्वेची वाहतूक संथ झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकातील पायऱ्यांना धबधब्याचे रूप आले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून स्थानकामध्ये दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले आहे.
कालमध्ये ठाण्याच्या फलाट क्र. १ वरील शिड्यांवरील वाहणाऱ्या पाण्याचे स्वरूप हे धबधब्या सारखे झाले होते. पाणी हे रेल्वे रुळावर साचायला लागले होते. याची दखल आता मध्य रेल्वेने घेतली असून या ठिकाणी पाण्याची वाट देऊन नाला काढण्याचे काम सुरू केले आहे. शिड्यांवरून चालताना काल रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. काल रेल्वेच्या हद्दीबाहेरून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे पायऱ्यांवर धबधबा झाल्याचे दिसत होते. आज रेल्वे प्रशासनाने एका दिवसानंतर प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत कामाला सुरुवात केली आहे.