ETV Bharat / city

ठाण्यात मुल्लाबाग डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज डेपो असे नामांतर

ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरामध्ये परिवहन सेवेचा मुल्लाबाग डेपो मागील काही दिवसांपासून नामांतराच्या प्रतीक्षेत होता, दोन वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत नामांतराचा विषय मंजूर देखील झाला होता. मात्र प्रत्यक्षात या डेपोचे प्रशासनाकडून नाव बदलण्यात येत नव्हते.

THANE
छत्रपती शिवाजी महाराज डेपो असे नामांतर
author img

By

Published : Feb 21, 2021, 7:34 AM IST

Updated : Feb 21, 2021, 1:20 PM IST

ठाणे - गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करून घोडबंदर रोड परिसरातील परिवहन सेवेचा मुल्लाबागया बस डेपोचे नामांतर करण्याची मागणी नागरिंकामधून केली जात होती. अखेर शिवजंयतीचा मुहूर्त साधत या डेपोचे छत्रपती शिवाजी महाराज डेपो असे नामांतर करण्यात आले आहे. त्या आशयाचे स्टिकर्स देखील टीएमटी बसवरती लावण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज डेपो असे नामांतर

ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरामध्ये परिवहन सेवेचा मुल्लाबाग डेपो मागील काही दिवसांपासून नामांतराच्या प्रतीक्षेत होता, दोन वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत नामांतराचा विषय मंजूर देखील झाला होता. मात्र प्रत्यक्षात या डेपोचे प्रशासनाकडून नाव बदलण्यात येत नव्हते. त्यासाठी अनेक संघटनांनी पत्र व्यवहारदेखील केले होते. मात्र तरीही प्रशासन काहीच करत नसल्याचा निषेध करत शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत डेपोचे नामांतर करून टीएमटी बसवर देखील या बदललेल्या नावाचे स्टिकर्स लावले.

छत्रपती शिवाजी महाराज डेपो असे नामांतर
छत्रपती शिवाजी महाराज डेपो असे नामांतर
निधीची कमतरता खोटी हजारो कोटींचे बजेट असलेल्या ठाणे महानगर पालिकेत निधीची कमतरता नाही, याउलट सत्ताधारी शिवसेना फक्त शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करतात. गरज नसलेल्या ठिकाणी शेकडो कोटींचे रस्ते बिल्डरच्या फायद्या साठी बनवले, असाही आरोप त्यांनी केला. तसेच डेपोच्या ठिकाणी जर शिवाजी महाराजांच्या नावाची कमान न बांधल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

Last Updated : Feb 21, 2021, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.