ETV Bharat / city

ठाण्यात रेल्वेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर; दररोज ३०० वेळा बंद पडतात सरकते जिने

ठाणे रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी, दम्याचे रोगी, गरोदर महिला तसेच सामान्य प्रवाशांसाठी एकूण आठ सरकते जिने बसवले असून हे जिने बहुतांश वेळा बंदच असतात. दररोज सरासरी जवळपास ३०० वेळा हे जिने बंद पडत असल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. नागरिकांना जिने चढताना प्रचंड त्रास होत असून हे बंद पडलेले जिने म्हणजे सामान्य प्रवाशांच्या पैशांची खुलेआम लूट असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

रेल्वेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:35 PM IST

ठाणे - येथील ठाणे रेल्वे स्थानकात एकूण आठ सरकते जिने (एस्कलेटर) आहेत. हे जिने दररोज २०० ते ३०० वेळा बंद पडत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच जुलै महिन्यात अंदाजे १० वेळा हे सरकते जिने बंद पडल्याचे देखील समोर आले आहे. याबाबत स्टेशन मास्तरांशी विचारले असता त्यांनी हे योग्य आकडे नसल्याचे सांगितले आहे. परंतु, दिवसातून १५ ते २० वेळा हे जिने विविध कारणास्तव बंद पडतात, असे सांगितले आहे.

बंद असलेल्या जिन्यांबद्दल प्रतिक्रिया देताना संतप्त नागरिक

मोठा गाजावाजा करून आणि प्रवाशांच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बसवलेले सरकते जिने सातत्याने बंद पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथून दररोज प्रवास करणाऱ्या जवळपास सात ते आठ लाख प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तब्बल आठ सरकते जिने या रेल्वे स्थानकात लावण्यात आले आहेत. याचा विशेष लाभ हा ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी, दम्याचे रोगी, गरोदर महिला यांना होतो. या सरकत्या जिन्यांमुळे सामान्य प्रवाशांनाही खूप फायदा होतो. परंतु गेल्या काही महिन्यांत हे सरकते जिने सातत्याने बंद पडत असल्याने लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सरासरी जवळपास ३०० वेळा हे एस्कलेटर्स बंद पडत असल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. नागरिकांना जिने चढताना प्रचंड त्रास होत असून हे बंद पडलेले जिने म्हणजे सामान्य प्रवाशांच्या पैशांची खुलेआम लूट असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. बंद पडलेले जिने दुरुस्त करण्यासाठी ठेवलेले कर्मचारी हे कधीच वेळेवर येत नाहीत व मुळात हे जिने असे सारखे बंद का पडतात हा प्रश्न कायम आहे. तसेच याबाबत ठाणे रेल्वेस्थानक मास्तरांनी ही आकडेवारी योग्य नसून दिवसातून १५ ते २० वेळा हे सरकते जिने बंद पडत असल्याचे सांगितले आहे.

यामुळे बंद पडतात सरकते जिने-

१) तरुणांकडून होणारा खोडसाळपणा
२)सेन्सर मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी
३)सरकत्या जिन्याच्या हँड बेल्ड च्या बाजूला असणारा बंद बटन प्रेस करणे
४)सरकत्या जिन्या वर वस्तू अडकणे

Intro:रेल्वेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर.. दररोज 300 वेळा बंद पडतायत एस्कलेटर.. प्रवासी हैराण.. Body:
ठाणे स्थानकातील एकूण आठ सरकते जिने असून हे दररोज 200 ते 300 वेळा बंद पडत असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे.तसेच जुलै महिन्यात तब्बल 10 हजाराच्या वर हे सरकते जिने बंद पडत असल्याचे देखील समोर आले आहे. या बाबत स्टेशन मास्तरांशी बोलले असता त्यांनी हे योग्य आकडे नसल्याचे सांगितले आहे परंतु दिवसातून 15 ते 20 वेला हे जिने विविधी करणास्थाव बंद पडतात असे सांगितले आहे .
मोठा गाजावाजा करून आणि प्रवाश्यांच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बसवलेले एस्कलेटर अर्थात सरकते जिने सातत्याने बंद पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथून दररोज प्रवास करणाऱ्या जवळपास सात ते आठ लाख प्रवाश्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तब्बल आठ सरकते जिने या रेल्वे स्थानकात लावण्यात आले आहेत. याचा विशेष लाभ हा ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी, दम्याचे रोगी, गरोदर महिला यांना होतो. अवजड सामान घेऊन पायऱ्या चढणे म्हणजे एक दिव्यच होऊन बसलेले असते परंतु या सरकत्या जिन्यांमुळे सामान्य प्रवाश्याना खूप फायदा होतो. परंतु गेल्या काही महिन्यात हे एस्कलेटर्स सातत्याने बंद पडत असल्याने लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. दररोज सरासरी जवळपास 300 वेळा हे एस्कलेटर्स बंद पडत असल्याने प्रवासी नाराज झालेत आहेत. नागरिकांना जिने चढतांना प्रचंड त्रास होत असून हे बंद पडलेले जिने म्हणजे सामान्य प्रवाश्यांच्या पैशांची खुलेआम लूट असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. बंद पडलेले जिने दुरुस्त करण्यासाठी ठेवलेले कर्मचारी हे कधीच वेळेवर येत नाहीत व मुळात हे जिने असे सारखे बंद का पडतायत याचे गूढ कायम आहे. तसेच या बाबत ठाणे रेल्वे स्थानक मास्तरांनी ही आकडे वारी योग्य नसून दिवसातून 15 ते 20 वेळा हे सरकते जिने बंद पडत असल्याचे सांगितले आहे .

1)हे सरकते जिने बंद पडण्याचे कारण म्हणजे तरुणांकडून होणार खोडसाळ पणा....

2)सेन्सर मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी

3)सरकत्या जिन्याच्या हँड बेल्ड च्या बाजूला असणारा बंद बटन प्रेस करणे
4)सरकत्या जिन्या वर वस्तू अडकणे आशा विविध प्रकारच्या अडचणी मुळे हे सरकते जिने बंद पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून बोलले जात आहे..परंतु याच ठिकाणी प्रत्यक्षात पाहिले असता अर्ध्या तासात जवळ पास हे सरकते जिने 8 ते 10 वेळा चालू बंद झाल्याचे चित्र दिसून आले आहे
BYTE - सुधाकर पतंगराव (रेल्वे प्रवासी संघटना )

Byte: रेल्वे प्रवाशी 1,2,3,4,Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.