ठाणे - भिवंडी शहर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तेव्हा काँग्रेसने या फुटीर नगरसेवकांचे पद रद्द करण्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली. या तक्रारीच्या अनुषंगाने कोकण आयुक्तांपुढे १८ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश १८ फुटीर नगरसेवकांना दिले आहेत.
हेही वाचा... 'मुंबईच्या 'मातोश्री'चा शक्तीपात, तर दिल्लीची मातोश्री शक्तीशाली'
भिवंडी शहर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा १८ नगरसेवकांनी पक्षादेश झुगारून कोणार्क विकास आघाडीच्या महापौर पदाच्या उमेदवारास मतदान केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रिषीका राका यांचा पराभव झाला. त्यांनतर काँग्रेस पक्षाचा पक्षादेश झुगारून विरोधकांना मदत करणाऱ्या त्या १८ नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कोकण आयुक्तांना आदेश देण्यात यावे, अशी तक्रार काँग्रेसचे नगरसेवक जावेद दळवी यांनी केली. या तक्रारीनुसार १८ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा... जयप्रभा स्टुडिओ विभाजन प्रस्ताव मान्य करू नका, स्टुडिओ बचाव शिष्टमंडळाची पालिकेकडे मागणी
कोकण विभागीय कार्यालयात गुरुवारी उपमहापौर इमरान खान खान यांच्यासह सहा फुटीर नगरसेवक हजर झाले होते. त्यांचे मत कोकण आयुक्त शिवाजी दौड यांनी ऐकून नोंदवून घेतले. मात्र कागदपत्रे तपासणीसाठी हवी आहेत. त्यामुळे वेळ द्यावा, अशी मागणी त्यांच्या वकीलांनी केल्यामुळे कोकण आयुक्तांनी दोन्ही बाजू ऐकून घेत फुटीर नगरसेवकांना १८ फेब्रुवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर पक्षांतर बंदी कायद्यान्वये या फुटीर १८ नगरसेवकांवर बडतर्फीची टांगती तलवार कायम असल्याने बोलले जात आहे.
हेही वाचा... 'आर्थिक प्रश्नांवर संसदेमध्ये चांगली चर्चा होईल अशी आशा..'