ETV Bharat / city

मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याने तरुणांच्या अंगावर घातली बुलेट; घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगर परिसरात एका मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याने तरुणांच्या अंगावर बुलेट घातल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याने तरुणांना मारहाण देखील केली आहे. तसेच एका तरुणावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे.

author img

By

Published : Jan 2, 2022, 7:01 PM IST

Updated : Jan 3, 2022, 9:26 AM IST

Ulhasnagar
उल्हासनगर

ठाणे : नववर्षाच्या स्वागतसाठी मित्रासोबत घराबाहेर उभे असलेल्या तरुणांवर एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या अंगावर थेट बुलेट घातल्याची घटना उल्हासनागरात घडली ( Incident of being hit by a bullet ) आहे. या घटनेत तरुण थोडक्यात वाचले, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. हा अधिकारी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तरुणांना मारहाणही केली. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 3 मधील कैलास नगर परिसरात घडली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे ( Assistant Inspector of Police Subhash Pansare )असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

घटनाचे सीसीटीव्ही फुटेज
अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप-उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 3, कैलास नगर येथील राहणारे रोहित भालेराव, रोहन भालेराव आणि यश शर्मा हे तिघे आपल्या घरासमोरच्या रात्रीच्या सुमारास नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यावर उभे होते. त्याच वेळेस उल्हासनगच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या ( Ulhasnagar Central Police Thane ) अधिका-याने सिंघमगिरी स्टाईलने ह्या तरुणांच्या अंगावर आपली बुलेट घातली. तसेच उभे असलेल्या या तरुणांना मारहाण करू लागला. यामधील काही तरुणांना मुका मार लागलेला आहे. तर एकाचा मोबाईल फुटला आहे. तसेच फिल्मी स्टाईलने तरुणांवर लाथाबुक्यांनी मारणारा पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत होता. असा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. तरुणावर जमावबंदीची कारवाई - मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत ( Central Police Thane ) असलेले सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे यांची थर्टी फर्स्टच्या रात्री ड्युटी लागली होती. ते आपली बुलेट घेऊन गस्ती वर निघाले होते. तेव्हा उल्हासनगर कॅम्प नंबर 3 ( Ulhasnagar Camp No. 3 ) येथील कैलास नगर मध्ये त्यांची बुलेट आली, आणि तिथं घराबाहेर उभे असलेल्या चार तरुणांवर त्यांनी थेट बुलेट अंगावर घातली. इतकंच नव्हे तर जो भेटेल त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करत एकाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर जमावबंदीची कारवाई केली. 'त्या' पोलीस अधिकाऱ्याचे चौकशी सुरु - अशा प्रकारे फिल्मी स्टाईलने मारहाण करण्याचा पोलिसांना अधिकार आहे का? असा प्रश्न वेळेस उपस्थित झाला आहे. तर घटना समोर आल्याने सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे यांच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. आता त्या पीडित तरुणांना चौकशी मधून न्याय मिळतो का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Jan 3, 2022, 9:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.