ETV Bharat / city

Thane Crime :...आणि बोहल्यावर चढण्याआधीच 'तो' अडकला पोलिसांच्या बेडीत, जाणून घ्या सविस्तर प्रकरण

बायकोला महागड्या कारमध्ये फिरविण्यासाठी ठाण्यातील एका गुन्हेगाराने (Criminal Arrest In Thane) एक दोन नव्हे, तर अकरा गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून तो लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच शांतीनगर पोलिसांनी (Shanti Nagar Police Arrest Criminal From Wedding) त्याला अटक केली आहे.

Police arrested criminal from wedding tent in Thane

author img

By

Published : Dec 10, 2021, 5:04 PM IST

Updated : Dec 10, 2021, 6:45 PM IST

ठाणे - राजा राणीचा संसार थाटून वैवाहिक जीवन नव्याने सुरु करण्याचे एका गुन्हेगाराने ठरवले होते. विशेष म्हणजे त्याच्या लग्नाची तारीखही ठरली होती. मात्र, लग्नसोहळा धुमधकड्यात साजरा करण्यासाठी व सासरच्या मंडळींवर रुबाब झाडण्यासाठी तसेच होणाऱ्या बायकोला महागड्या कारमध्ये फिरविण्यासाठी, त्याला गरज होती बक्कड पैश्याची म्हणूनच त्याने एक दोन नव्हे, तर अकरा गुन्हे केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून तो लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच शांतीनगर पोलिसांच्या बेडीत अडकला आहे. शिवसिंग अमीर सिंग बाबरी (20) रा. टेमघर, भिवंडी, असे गुन्हेगाराचे नाव आहे.

प्रतिक्रिया

खबऱ्यांमुळे लागला पोलिसांच्या हाती -

भिवंडी शहरात विविध वाहने व सोनसाखळी, मोबाईल हिसकावून पळविण्याच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी सर्वच पोलीस ठाण्यात गस्त वाढविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्यासह पथकाने तपास सुरु केला असता एक मंगळसूत्र लंपास करणारा चोरटा भिवंडीत टेमघर पाईपलाईन परिसरात येणार असल्याची खबर मिळावी होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी शिवसिंगला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याचा चोरीच्या उद्देशाचा कारनामा समोर आला.

चोरीच्या पैश्यातून नवीन संसार थाटण्याचा मनसुबा उधळला -

आरोपी शिवलिंगचा येत्या २० जानेवारी रोजी विवाह होणार होता. मात्र, लग्न जुडवताना आपण खूप श्रीमंत असे सासरच्या मंडळींवर रुबाब झडण्यासाठी त्याने भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवली, कळवा परिसरातून १० महागडे वाहने चोरी केली होती. त्यामध्ये ५ कार आणि ६ दुचाक्या होत्या, तसेच होणाऱ्या बायकोसाठी एक मंगळसूत्रही चोरले होते. विशेष म्हणजे चोरीच्या वाहनातून तो होणाऱ्या बायकोला फिरविण्यासाठी नेत होता. शिवाय घरफोडीच्या गुन्ह्यातही याच चोरीच्या वाहनाचा वापर करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आणि त्याचा चोरीच्या पैश्यातून नवीन संसार थाटण्याचा मनसुबा पोलिसांनी उधळला लावला आहे.

आतापर्यत ६ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त -

आरोपीकडून आतापर्यत ६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी हस्तगस्त करून जप्त केला. तर पोलीस तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून यापूर्वी त्याने ४ गुन्हे केले असून आतापर्यत ११ गुन्हांची कबुली त्याने दिली आहे. तर आणखीही या सराईत आरोपीने गुन्हे केल्याची शक्यता असल्याने याचाही तपास शांतीनगर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा - Maharashtra MLC elections 2021 live updates : विधानपरिषद निवडणूक लाईव्ह अपडेट

Last Updated : Dec 10, 2021, 6:45 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.