ETV Bharat / city

पीएमसी बँक खातेदारांची मुख्यमंत्र्यांच्या सभेत निदर्शने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली आहेत. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली
author img

By

Published : Oct 12, 2019, 10:36 AM IST

Updated : Oct 12, 2019, 1:39 PM IST

ठाणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली आहेत. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना देखील यामध्ये लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे निदर्शकांना सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केली

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी ठाणे शहरात होते. महापालिकेसमोरील रस्त्यावर रात्री पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.

दरम्यान,सभा संपल्यानंतर निघत असतानाच महापालिका मुख्यालयाच्या आवारात गोळा झालेल्या पीएमसी बँक खातेदारांनी हातातील फलक दर्शवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्यास सुरुवात केली. खातेदारांचा रोष ओळखून मुख्यमंत्री फडणवीस तत्काळ या खातेदारांना येऊन भेटले.

सध्या आचारसंहिता सुरू असल्याने याबाबत काही बोलू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच 21 तारखेला मतदान झाल्यानंतर तातडीने याचा पाठपुरावा करून येत्या 15 किंवा 16 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आल्यानंतर त्यांच्यासमोर ही बाब मांडू, असे आश्वासन दिले.

खातेदारांवर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनीही पीएमसी खातेदारांना दिलासा दिला. याआधीही केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन मुंबईत आल्यानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेत बँकेच्या खातेदारांनी गोंधळ घातला होता.

Intro:पीएमसी बँक खातेदारांची मुख्यमंत्र्यांच्या सभेत निदर्शनेBody:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील सभेत उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी निदर्शने केल्याने खळबळ उडाली.हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन याचा पाठपुरावा करून पंतप्रधानांनाही यात लक्ष घालण्यास सांगेन.असे आश्वासन निदर्शकांना दिले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी ठाण्यात आले होते.ठाणे महापालिकेसमोरील रस्त्यावर रात्री पार पडलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा उहापोह केला.दरम्यान,सभा संपल्यानंतर माघारी निघत असतानाच महापालिका मुख्यालयाच्या आवारात गोळा झालेल्या पीएमसी बँक खातेदारांनी हातातील फलक दर्शवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्यास सुरुवात केली.काही दिवसापूर्वीच पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध टाकल्याने बँक बुडीत निघाली.या पार्श्वभूमीवर बँकेतील आमची रक्कम परत करून आमचीही दिवाळी झगमगू द्या.अशा मागण्या खातेदारांनी केल्या.अखेर,खातेदारांचा रोष ओळखून मुख्यमंत्री फडणवीस तात्काळ या खातेदारांना येऊन भेटले.त्यांनी,सध्या आचारसंहिता सुरु असल्याने याबाबत काही बोलू शकत नाही.तरीही 21 तारिखला मतदान झाल्यानंतर तातडीने याचा पाठपुरावा करू.किंबहुना,येत्या 15 किंवा 16 तारिखला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असून त्यांच्या समोर ही बाब मांडू.खातेदारांवर कुठचाही परिणाम होऊ देणार नाही.असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.त्यानंतर भाजप उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनीही पीएमसी खातेदारांना दिलासा दिला.
Byte किरीट सोमय्या भाजप खासदार
आन्दोलनकर्तेConclusion:
Last Updated : Oct 12, 2019, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.