ETV Bharat / city

रुग्णालयातून हरवलेल्या 'त्या' रुग्णाचा ४८ तासात शोध घेणार; ठाणे मनपाचे नातेवाईकांना आश्वासन

मागील दोन दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयातून हरवलेल्या रुग्णाचा येत्या ४८ तासांत शोध घेतला जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आले आहे. मात्र, भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Patient goes missing from Thane Municipal Corporation covid Hospital
ठाणे महानगरपालिका कोविड रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता
author img

By

Published : Jul 7, 2020, 6:29 PM IST

ठाणे - महापालिकेच्या विशेष कोविड रुग्णालयातून हरवलेल्या ७२ वर्षीय रुग्णाचा ४८ तासात शोध घेण्यात येईल, असे आश्वासन महानगरपालिकेने रुग्णाच्या नातेवाईकांना आणि भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, रुग्ण हरवण्याच्या गलथान प्रकाराबद्दल विशेष कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे प्रभारी किरीट सोमय्या यांनी कापूरबावडी पोलिसांकडे केली आहे.

ठाण्यातील भालचंद्र गायकवाड यांना विशेष कोविड रुग्णालयात ४ जुलै रोजी दाखल केले होते. मात्र, त्यांचा दोन दिवसांपासून शोध लागत नसल्याबद्दल गायकवाड कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानंतर भाजपचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज कापूरबावडी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर सनदी अधिकारी रणजीतकुमार, कोविड रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा यांनाही निवेदन देण्यात आले.

भाजप नेते किरीट सोमैया आणि बेपत्ता रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - ठाणे महापालिकेत ठेकेदारांचे उपोषण, 6 महिन्यापासून बिले न मिळाल्याने आक्रोश

गेल्या तीन दिवसांपासून गायकवाड कुटुंबीयांना महापालिका आणि पोलीस यंत्रणांकडून दाद दिली जात नव्हती. मात्र, आज भाजप नेत्यांसोबत महापालिका व पोलिस अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी पोलीस, महापालिका आणि विशेष कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने गलथानपणा झाला असल्याचे मान्य केले, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. महापालिकेच्या ताब्यातील रुग्ण हॉस्पिटलमधून हरवल्यावर 'मिसिंग'ची तक्रार दाखल कशी केली जाऊ शकते, असा सवालही किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केला. हरवलेल्या रुग्णाचा ४८ तासांत शोध घेण्याचे आश्वासन रणजीतकुमार आणि रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा यांनी भाजपच्या नेत्यांना आणि नातेवाईकांना दिले. त्यासाठी हॉस्पिटलबाहेरच्या यंत्रणांचीही मदत घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.