नवी मुंबई- नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आज दिवसभरात 128 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नवी मुंबईत काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे. आज 102 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईमध्ये गेल्या 10 दिवसात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4200 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. नवी मुंबईत 15737 लोकांची कोविड19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 10929 जण निगेटिव्ह आले असून 616 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4189 इतकी आहे. आज 128 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामध्ये तुर्भे मधील 22, बेलापूर (13), कोपरखैरणे (27), नेरुळ (16), वाशी (17), घणसोलीतील(16), ऐरोली (14), दिघ्यातील 3 या रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये 41 स्त्रिया व 87 पुरुषांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत नवी मुंबईत 2457 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. आज, नेरूळ मधील 4, वाशी मधील 22, तुर्भे मधील 16, कोपरखैरणे मधील 23, घणसोली मधील 21,ऐरोली मधील 8, दिघा 8 अशा एकूण 102 व्यक्ती आज कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 43 स्त्रिया आणि 59 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये 1603 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.