ETV Bharat / city

ठाणे : 22 फेब्रुवारी 2022 म्हणून आज 65 जोडपी अडकली विवाहबंधनात - 22-2-22 तारीख लग्न ठाणे

यावर्षी व्हॅलेन्टाइन डे पेक्षा आज झालेली लग्न ही आजच्या तारखेमुळे संस्मरणीय झालेली आहेत. ही तारीख अनेक दशका नंतर येत असल्याने आजच्या दिवशी ठाण्यात चक्क 65 लग्न झाली आहेत. दररोज 15 लग्न आणि व्हॅलेन्टाइन डे ला 40 लग्न, पण आज 65 लग्न ही आकडेवारीच आजच्या तारखेचे महत्व सांगत आहे.

22 February 2022 wedding thane
नवविवाहित जोडपे
author img

By

Published : Feb 22, 2022, 10:46 PM IST

ठाणे - आपले लग्न हे संस्मरणीय ठराेव हे सगळ्यांना वाटत असते. त्यासाठी करोडो रुपयांचा खर्चही केला जातो. मात्र, यावर्षी व्हॅलेन्टाइन डे पेक्षा आज झालेली लग्न ही आजच्या तारखेमुळे संस्मरणीय झालेली आहेत. ही तारीख अनेक दशका नंतर येत असल्याने आजच्या दिवशी ठाण्यात चक्क 65 लग्न झाली आहेत. दररोज 15 लग्न आणि व्हॅलेन्टाइन डे ला 40 लग्न, पण आज 65 लग्न ही आकडेवारीच आजच्या तारखेचे महत्व सांगत आहे.

माहिती देताना नवविवाहित जोडपे

हेही वाचा - Bengal monitor in bungalow : जेलरच्या बंगल्यात घोरपड घुसल्याने कर्मचांऱ्यासह कैद्यांची धावपळ; 'अशी' केली सुटका

अनेक प्रेमीयुगल लग्न करण्यासाठी व्हॅलेन्टाईन डे च्या दिवसाला पसंती देत असतात. त्यामुळे, व्हॅलेन्टाईन डे ला 40 जोडपी विवाहबंधनात अडकली होती. तर, आजची तारीख 22-2-22 ही अनोखी असल्याने आजच्या दिवशी ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात 65 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. आजची तारीख 22-2-22 असल्याने यामध्ये 2 हा आकडा सहा वेळा आला आहे. याच अनोख्या दिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील जवळपास 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत.

आमच्यासाठी हा लकी दिवस असून या अनोख्या दिवशी आम्ही विवाह बंधनात अडकायचे ठरवले होते. तसेच, अनोखी तारीख पुन्हा कधी येणार नाही यासाठी पंचेचाळीस दिवस अगोदरच रजिस्ट्रेशन करून ठेवल्याचे काही जोडप्यांनी सांगितले. पुढे या तारखेचा दिवस पुन्हा कधीच येणार नाही आणि ही तारीख आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आजच्या तारखेत 2 आकडा सहा वेळा आल्याने हा शुभ दिवस असल्याचे नवविवाहित जोडप्यांनी सांगितले.

हेही वाचा - Thane Municipal Election: ठाण्यात महाविकास आघाडी झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.