नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अडीच कोटी किंमतीचे एम डी नावाचे ड्रग्ज (Navi Mumbai police seize drugs) पकडले आहेत. याआधी नवी मुंबई पोलिसांनी एम डी ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरीत धाड टाकून या ड्रग्ज जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांनी 'नशा मुक्त नवी मुंबई' अभियानाच्या अंतर्गत अंमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, विनायक वस्त, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडून ड्रग्ज माफियांचा शोध घेत होते. 30 डिसेंबरला गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संजय फुलकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. पोलिसांनी कलीम रफीक खामकर याला पनवेल तालुक्यातील एमडी अंमली पदार्थासह नेरे येथून ताब्यात घेण्यात आले. जकी अफरोज पिट्टु, सुभाष रघुपती पाटील यांना अटक केले. अडीच कोटींचे 2 किलो 500 ग्रॅम किंमतीचा एम डी ड्रग्ज हा अंमली पदार्थ जप्त केला.
एम डी ड्रग्जचा कारखाना शोधण्यात आले यश
या तिन्ही आरोपीविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच प्रथमच एम डी ड्रग्ज’ तयार करण्याचा कारखाना शोधण्यात पोलिसांना यश आले असून. हा कारखाना सिल करण्यात आला आहे गुन्हयाचा तपास सुरु आहे.
हेही वाचा - Wardha Crime: धक्कादायक: संशयी पत्नीने पतीस करायला लावला शेजारच्या मुलीवर बलात्कार!