ठाणे - भाईंदर पश्चिमेच्या जीसीएस बँक्वेट हॉलमध्ये ३०० पेक्षा अधिक नागरिक गरबा खेळत असताना भाईंदर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये अनेक नागरिक विना मास्क, सामाजिक अंतराचे पालन न करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - शाहरूख खानचा मुलगा असेल किंवा कोणीही, कठोर कारवाई झाली पाहिजे - रामदास आठवले
विना परवानगी गरब्याचे आयोजन
भाईंदर पश्चिमेला असलेल्या जीसीएस बँक्वेट हॉलमध्ये गरबा रासचे आयोजन करण्यात आले होते. हॉलमध्ये ३०० पेक्षा अधिक नागरिक गरबा खेळत असल्याची माहिती भाईंदर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जीसीएस बँक्वेटमध्ये धाड टाकली असता ३०० पेक्षा अधिक नागरिक गरबा खेळत असल्याचे आढळून आले. आयोजकाकडून नागरिकांना २५० रुपये घेऊन प्रवेश पास देण्यात आले होते. गरबा खेळताना अनेक जण विना माक्स, सामाजिक अंतरचे पालन न करत असल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी आयोजक यश छाजड, हसमुख परिहार अशा दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
भाईंदर पश्चिमच्या जीसीएस बँक्वेट हॉलमध्ये गरबा आयोजन करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी दिली.
हेही वाचा - कल्याणमधील प्राइम फार्मा कंपनीतुन कॅन्सर रोगावरील बनावट औषधांचा साठा जप्त; एका महिलेला अटक