ETV Bharat / city

Rajyasabha Election 2022 : राज्यसभेच्या निवडणुकासाठी मनसेची भाजपाला साथ - mla raju patil rajyasabha election

मनसेचे एकमेव आमदार राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाला मतदान करणार आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे पालन करुन उद्या मतदान करणार असल्याचे राजू पाटील यांनी म्हटलं ( mla raju patil voting bjp candidate rajyasabha election ) आहे.

raj thackeray
raj thackeray
author img

By

Published : Jun 9, 2022, 6:38 PM IST

ठाणे - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी घोडेबाजार सुरू असताना अपक्ष आमदारांना साकडे घालते जात आहे. महाविकास आघाडी आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू असताना अपक्ष आमदारांना गळ घातली जात आहे. कल्याण विधानसभेचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाला साथ दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघातील समस्यांबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आदेश देतील, त्यानुसार मतदान करणार असल्याचे पाटील यांनी म्हटलं ( mla raju patil voting bjp candidate rajyasabha election ) आहे.

राजू पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

राजू पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकासाठी मनसे पक्ष भाजपाला पाठिंबा देत आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे पालन करून उद्या मतदान करणार आहे. तर, निवडणुका या आतापर्यंत आम्ही एकट्याने लढवल्या आहेत. आता भाजपा पक्षाने आमची मदत मागितली. त्यामुळे आम्ही मदत करत आहोत. आता पुढे राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्ही पाळू, असे देखील राजू पाटील यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Elections: राज्यसभेसाठी उद्या मतदान; 'या' राज्यात घोडेबाजाराची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.