ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात धर्मीचा पाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. रस्त्याअभावी गावकऱ्यांनी तिला चादरीच्या झोळीत टाकून आरोग्य केंद्रापर्यत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसूती झाली. तिच्या डोळ्यादेखत तिचे मुलं झोळीतच दगावल्याने त्या मातेचं काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. या घटनेनंतर शिंदेच्या गटाच्या स्थानिक आमदारांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला योग्य न्याय मिळवून देण्याचे आश्वासन Death of a newborn child due to lack of road दिले. तसेच रस्त्याच्या कामासाठी १० लाखांचा निधी आमदार फंटातून जाहीर केल्याची माहिती आमदार शांताराम मोरे यांनी MLA visit in Pada दिली.
मातेच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू भिवंडी तालुक्यातील दिघाशी ग्रामपंचायत हद्दीतील धर्मीचा पाडा येथील, दर्शना परले (वय ३५) या गर्भवती महिलेस १ सप्टेंबर रोजी प्रसूती वेदना होऊ लागल्या. वेदना असह्य झाल्याने तीला प्रसुतसाठी दिघाशी येथील १ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात गावकरी निघाले होते. मात्र रस्त्याअभावी झोळीत टाकून जंगलातून तसेच पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत पायपीट करत असतानाच, वाटेतच झोळीमध्ये तिची प्रसुती झाली. मात्र आरोग्य सेवा ऊपलब्ध नसल्याने, तातडीने ऊपचार मिळाले नाही. त्यामुळे, झोळीतच या मातेच्या डोळ्या देखत मुलाचा मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर दर्शनाला आपल्या मुलाचा मृत्यू पहावा लागला.
आमदारांनी पोलीस बंदोबस्तात गाठला धर्मीचा पाडा खळबळजनक बाब म्हणजे, घटना घडून २४ तास उलटून गेले होते. मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिंधीनी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या महिलेच्या कुटूंबाची भेट घेतली नसल्याने गावकरी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आज दुपारी शिंदे गटातील स्थानिक आमदार शांताराम मोरे हे पोलीस बंदोबस्तात धर्मीचा पाडा येथे १ किलोमीटर जंगल आणि ओढ्याच्या पाण्यातून पायपीट करत पीडित महिलेच्या कुटुंबाची भेट MLA visit after Death of a newborn child घेतली. दरम्यान आपण स्वतः सोमवारी जिल्हा अधिकारी कार्यलयात जाऊन पीडित महिलेला सर्वतोपरीने न्याय मिळवून देण्यास लेखी पत्र देऊन पाठपुरावा करणार शिवाय लवकरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासींच्या नशिबी वेदनादायक जगणे, अन पारतंत्र्याचा अंधार या पाड्यात आजपर्यत कोणत्याही मूलभूत पायाभूत सुविधा नाहीतच, मात्र जिओ कंपनीचे मोबाईल नेटवर्क तेवढे आहे. इथूनच गुगल मॅपचा वापर करून हा पाडा ते मुंबई मंत्रालयाचे अंतर मोजले तर ते केवळ ८१ किलोमीटर आहे, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अंतर मोजले तर ते अवघे ४२ किलोमीटर आहे. भिवंडी तहसील कार्यालयाचे अंतर मोजले तर ते फक्त २४ किलोमीटर एवढे आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याचे मुख्यालय असलेल्या या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या धर्मी पाड्यात आदिवासींच्या नशिबी आलेले हे वेदनादायक जगणे खरच व्यथित करणारे आहे. ४० ते ५० मतदार आणि दीडशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पाड्यात जाण्याचा रस्ता त्यांना सापडत नाही. विकास झाला तो फक्त शहरानजीक गावांचा, मात्र आजही बहुतांश पाडे दुर्लक्षितच राहिले. धर्मी पाड्यात रस्ता होण्याबाबत जबाबदार प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर श्रमजीवी आंदोलन करेल असा इशारा गेल्या वर्षी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी दिला होता.
अनेक वर्षापासून रस्ताच्या मागणी विशेष म्हणजे रस्ताच्या मागणीसाठी अनेक वर्षापासून गावकरी वारंवार शासकीय अधिकाऱ्याकडे मागणी करीत आहे. मात्र त्यांच्या मागणीची अद्यापही स्थानिक शासकीय यंत्रणेने दखल घेतली नसल्याने अश्या दुर्घटना घडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला कालच केला होता. आज मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार मोरे यांनी रस्त्याच्या प्रश्नासह इतरही मूलभूत नागरी सुविधा देण्याचे आश्वसन दिले आहे. MLA visit in Pada in Thane district after Death of a newborn child due to lack of road