ETV Bharat / city

व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा, जितेंद्र आव्हाडांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

व्हीव्हीपॅटचा आलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. जर, व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करायची नसेल, तर ते लावलेच कशाला ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.

आमदार जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : May 7, 2019, 1:53 PM IST

मुंबई - व्हीव्हीपॅटच्या मोजणीबाबत 21 पक्षांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. या निकालाबाबत आमदार आव्हाड म्हणाले, की व्हीव्हीपॅटचा आलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. जर, व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करायची नसेल, तर ते लावलेच कशाला ? इव्हीएमवरील असलेले शंकेचे निरसण करण्यासाठी व्हीव्हीपॅटचे आगमन झाले. जर, व्हीव्हीपॅटची मतमोजणीच होत नसेल, तर संशयाला अजून जागा मिळते, असेही ते म्हणाले.

व्हीव्हीपॅटची मतमोजणी झालीच पाहिजे. 21 पक्षांच्या नेत्यांनी आता शांत बसता कामा नये, रस्त्यावर उतरा. इव्हीएम मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. जगातून इव्हीएम हद्दपार झाले. ते फक्त आपल्या देशामध्ये ठेवण्यात आलेले आहे. कारण ते मॅनेज होते, म्हणून व्हीव्हीपॅटबाबत आग्रही झाले पाहिजे. 50 टक्के नव्हे 100 टक्के व्हीव्हीपॅट मोजले गेलेच पाहिजेत. आमचे मतदान पेटीत कसे पडले ते आम्हाला कळलेच पाहिजे असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

Intro:व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी रस्त्यावर उतरा
आ. जितेंद्र आव्हाड यांचे आवाहनBody:
व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे 21 पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र् आव्हाड यांनी केले आहेई
लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. या निकालाबाबत आ. आव्हाड म्हणाले की, व्हीव्हीपॅटचा आलेला निर्णय हा अत्यंत दुर्देवी आहे. जर, व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करायची नसेल तर ते लावलेच कशाला? इव्हएमवरील असलेले शंकेचे निरसण करण्यासाठी व्हीव्हीपॅटचे आगमन झाले. जर, व्हीव्हीपॅटची मतमोजणीच होत नसेल तर संशयाला अजून जागा मिळते. व्हीव्हीपॅटची मतमोजणी झालीच पाहिजे. 21 पक्षाच्या नेत्यांनी आता शांत बसता कामा नये; रस्त्यावर उतरा.इव्हीएम मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. जगातून इव्हीएम हद्दपार झाले. ते फक्त आपल्या देशामध्ये ठेवण्यात आलेले आहे. कारण ते मॅनेज होतंय! म्हणून व्हीव्हीपॅटबाबत आग्रही झाले पाहिजे. 50 टक्के नव्हे 100 टक्के व्हीव्हीपॅट मोजले गेलेच पाहिजेत. आमचं मतदान पेटीत कसे पडलेय ते आम्हाला कळलेच पाहिजे.
Byte जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस नेते)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.