ETV Bharat / city

Sachin Basre As Kalyan City Chief : शिंदे गटातील आमदार शहर प्रमुखपदावरून पायउतार; पदाचा कार्यभार सचिन बासरेंकडे

author img

By

Published : Jul 17, 2022, 2:21 PM IST

शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर ( Shinde group MLA Vishwanath Bhoir ) यांना शहर प्रमुखपदावरून पायउतार करण्यात आले ( Step Down From Kalyan City Chief Post ) आहे. त्यांच्या जागी कल्याण शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली ( Sachin Basre As Kalyan City Chief ) आहे. त्यामुळे आता सचिन बासरे हे कल्याण शहर अध्यक्षपदचा कार्यभार पाहतील. विश्वनाथ भोईर यांना पदावरून पायउतार केल्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

Sachin Basare as city chief
सचिन बासरेंची शहर प्रमुखपदी निवड

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या पत्रकाद्वारे हि माहिती कळविण्यात आली आहे. यावेळी नेते जरी शिवसेना सोडून गेले असले तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच असल्याचे सचिन बासरे यांनी सांगितले आहे. तर पदावरून काढले तरी, मी आजन्म शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर ( Shinde group MLA Vishwanath Bhoir ) यांनी दिली आहे.

सचिन बासरेंची शहर प्रमुखपदी निवड

सचिन बासरेंची शहर प्रमुखपदी निवड - विद्यमान शहर प्रमुख आमदार विश्वनाथ भोईर हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्या शहर प्रमुख पदाबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती. या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून आमदार विश्वनाथ भोईर यांच्या जागी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि तीन वेळा नगरसेवक असलेल्या सचिन बासरे यांची निवड करण्यात आल्याचे शिवेसेनेच्या अधिकृत सामना या मुखपत्रातून जाहीर केले आहे. त्यांच्या या निवडीनंतर त्यांनी शिवसेनेच्या कल्याण शहर शाखेत पदभार स्वीकारला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक भेटीला येत होते. यावेळी जेष्ठ शिवसैनिक रवी कपोते, शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील, हेमंत चौधरी, वंडार कारभारी, गणपत घुगे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच केडीएमसीवर भगवा फडकवू - सामान्य शिवसैनिक म्हणून आपली शहर प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी नियुक्ती केली आहे. याचा आनंद असून हि एक मोठी जबाबदारी आहे. हि जवाबदारी सर्व जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना बरोबर घेऊन पार पाडणार आहे. कल्याणच्या जनतेने जे प्रेम शिवसेनेला दिलं आहे ती जनता आमच्या पाठीशी असून आगामी काळात पुन्हा केडीएमसीवर भगवा फडकवू ( KDMC Municipal Corporation ). नेते जरी आज शिवसेना सोडून गेले असले तरी शिवसैनिक शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं याचा विचार करणार नाही कोण आहेत आणि कोण आमच्यासोबत येणार त्यांना सोबत घेवून संघटनेच काम करेन असे यावेळी सचिन बासरे यांनी सांगितले.

शिवसेनेचा प्रोटोकॉल पाळला - शहर प्रमुख पदावरून काढण्यावरून ( Step Down From City Chief Post ) याबाबत आमदार विश्वनाथ भोईर ( MLA Vishwanath Bhoir ) यांना विचारले असता, गेल्या ७ वर्षांपासून आपण शहर प्रमुख होतो. दर ५ वर्षांनी शहर प्रमुख बदलण्याचा शिवसेनेचा प्रोटोकॉल असून त्यापेक्षा मला दोन वर्षे जास्ते काम करायला मिळाले याचा आनंद आहे. नवीन शहर प्रमुख सचिन बासरे यांना शुभेच्छा देत, मला पदावरून काढले असले तरी मी आजन्म शिवसैनिक राहणार ( forever Shiv Sainik ) अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा - Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.