मीरा भाईंदर(ठाणे)- शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ४ हजारांवर पोहोचली आहे. शनिवारी १२६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयात उपचारा दरम्यान ६ जणांचा
मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात १२८ रुगणांनी कोरोनावर मात केली आहे. मीरा भाईंदर शहरात २ हजार ९४६ जणांनी कोरोनावर मात केली असून एकूण मृत्यूची संख्या १५८ वर पोहचली आहे.
मीरा भाईंदर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ हजार ११ झाली. १२८२ रुग्णांचा कोविड अहवाल प्रतीक्षेत आहे तर ९०७ जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी आढळून आलेल्या १२६ रुग्णांमध्ये ७४ नवे रुग्ण असून ५२ जणांना हायरिक्स संपर्कातून लागण झाल्याची प्राथमिक माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
मिरारोड पूर्व भागात ३८,भाईंदर पूर्व मध्ये ४५ तर भाईंदर पश्चिम परिसरात ४३ रुग्ण आढळून आले आहेत.रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे १० जुलै पर्यंत शहरात कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. तरी ही आज समोर आलेल्या आकडेवारी मुळे मीरा भाईंदरच्या नागरिकांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.