ETV Bharat / city

Minister Kapil Patil displeasure in Program: भूमिपूजन सोहळ्यात मंत्री कपिल पाटलांची नाराजी, एकनाथ शिंदेंनी 'अशी' काढली समजूत

कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ( MMRDA work at Durgadi fort ) दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडीवर सहा पदरी पूल बांधण्यात आला आहे. यातील दोन मार्गिकांचे याआधी लोकार्पण करण्यात आले होते. तर उर्वरित चार मार्गिकांचे आज लोकार्पण ( four highways work at Bhivandi ) करण्यात आले.

कपिल पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त
कपिल पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त
author img

By

Published : Feb 17, 2022, 10:00 PM IST

Updated : Feb 17, 2022, 10:09 PM IST

ठाणे- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनामुळे कल्याण डोंबिवलीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते साधेपणाने ( Smart city development work inauguration in Kalyan ) करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्राचा उल्लेख न केल्याने केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ( Minister Kapil Patil with Eknath Shinde ) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

स्मार्ट सिटी अंतर्गत खाडी किनारा विकसितकरणाचे भूमिपूजन
कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ( MMRDA work at Durgadi fort ) दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडीवर सहा पदरी पूल बांधण्यात आला आहे. यातील दोन मार्गिकांचे याआधी लोकार्पण करण्यात आले होते. तर उर्वरित चार मार्गिकांचे आज लोकार्पण ( four highways work at Bhivandi ) करण्यात आले. या पुलामुळे भिवंडी कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र हे उल्हास नदी किनाऱ्यावर वसलेले आहे.

एकनाथ शिंदेंनी 'अशी' काढली समजूत

हेही वाचा-KCR to Meet CM Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुख्यमंत्री ठाकरेंची घेणार भेट; विरोधकांची मोट बांधण्याचा नवा प्रयत्न

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक सुविधा उपलब्ध-

कल्याण डोंबिवली शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा सांगणारा प्राचीन दुर्गाडी किल्ला हे या शहराचे प्रतिक आहे. दुर्गाडी किल्ल्यालगतच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची नौका बांधणीची मुहूर्तमेढ रोवली होती. या किनाऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नदी किनारा व नेव्हल गॅलरी विकसित करण्याचा प्रकल्प स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हाती घेण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भारतीय नौसेनेचा अति विशाल माहितीपट तसेच 2.5 कि.मी किनारा सुशोभीकरण, दुर्गाडी किल्ल्या लगत बगीचा विकसित करणे, पायवाट व सायकल ट्रॅक बनविणे उपलब्ध होणार आहे. तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया, व्याख्यान एरिया तयार करणे इत्यादी सुविधांमुळे कल्याण शहराचा नदीकिनारा विकसित होऊन नागरिकांना मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉककरिता पर्याय उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा-अनाथ शबानाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर; महाविद्यालयात मिळाला ‘एमबीबीएस’ला प्रवेश

महानगरपालिकेच्या सभागृहाचे नुतनीकरण..
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे नुतनीकरण ( Renew Vinayak Savarkar hall in Kalyan ) करण्यात आले आहे. सभागृहामध्ये एकूण १४५ महापालिका सदस्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक गॅलरी, पत्रकार गॅलरी व महत्वाच्या व्यक्तीसाठी व्ही.आय.पी. कक्ष अशी सुसज्ज आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमांची माहिती देतांना केंद्राचा उल्लेख न केल्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटीतील विकासकामांमध्ये केंद्राचा अर्धा निधी असल्याने केंद्राचादेखील उल्लेख करणे आवश्यक होते, असे मत यावेळी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की पाटील साहेब आपल्या हातानेही नारळ फोडला आहे.

हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद, गुरुवारी २५९ नवे रुग्ण

डायलिसिस सेंटरचे लोकापर्ण ...
कल्याण पूर्व परिसरात प्रभाग क्र. १०० तिसगाव गावठाण मध्ये डायलिसिस सेंटर तयार करण्यात आले आहे. या डायलिसिस सेंटर मध्ये १० बेड्स, नर्सेस रूम, नर्सेस चेंजिंग रुम, फार्मसी रुम, स्वागत कक्ष, डायलिसिस वॉशिंग एरिया, स्वच्छतागृह, आरओ प्लांट व संपूर्ण वातानुकूलित डायलिसिस हॉलची सुविधा निर्माण करण्यात आले आहे. हे काम अवघ्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी नगरविकास, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, रविंद्र फाटक, युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई, एमएमआरडीएचे संचालक, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Last Updated : Feb 17, 2022, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.