ठाणे - ठाण्यात आज एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाणेकर नाट्यगृहात लोकनाथ या त्यांच्यावरील तयार केलेली चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक सिनेकलाकार देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्यावर दिग्दर्शक विजू माने यांनी कविता केली होती. ही कविता ऐकून एकनाथ शिंदे भावूक झालेले पाहायला मिळाले.
कार्यक्रमात माझ्यावर असलेले गाणे आज तयार केले. त्या सर्व टीमचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. विजू माने यांनी माझ्यावर तयार केलेली कविता देखील आज कळली, हे असे काही नियोजित आहे हे देखील मला माहिती नव्हते, असे सांगत शिंदे यांनी ही कविता सरप्रारिज आहे असे म्हटले. महाराष्ट्रात युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. निर्धारित वेळेत ही कामे केली जाईल. क्लस्टर इमारतबाबत धोरणात्मक काम होत आहे. त्याचे आज खऱ्या अर्थाने भूमिपूजन होत आहे. लोक जीव मुठीत घेऊन राहत होती, त्यांच्यासाठी क्लस्टरच्या योजनेचे उद्घाटन होत असल्याने आनंद होत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
महापौर नरेश म्हस्के -
एकनाथ शिंदे यांच्या जीवनावरील या ध्वनिचित्रफीचे अनावरण झाले. एकनाथ संभाजी शिंदे हे नावच काफी आहे. एकनाथ महाराज यांचे नाव एकनाथ शिंदे यांना दिले गेले. वडिलांचे नाव संभाजी शिंदे, आडनाव हे महाराजांच्या नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या जास्त कामामुळे ते दिसत आहे, अशी प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमात महापौरांनी वक्त केली.
प्रवीण तरडे -
शेतीवरील विषयावर एकनाथ शिंदे यांनी मला दिलेले सल्ला त्याबाबत देखील मी बघितले, आमची थेटर 100 टक्के उघडी करा हेच आमच्यासाठी रिटण गिफ्ट द्याल आणि हे तुम्हीच करू शकतात, शरद पोंक्षे मी आज एकनाथ शिंदेंमुळे उभा आहे, माझा नावाची एकाक्की स्पर्धा भरवली असती, असे प्रवीण तरडे म्हणाले.
ऊर्मिला मातोंडकर -
हे कटाऊट लावले आहेत ते चित्रपटासारखे दिसत आहे असे शिंदे यांनी मला खाली बसताना सांगितले. तसे नाही तर समाजात काम करणारे खरे काम आणि कधीच हार मानली नाही तुम्ही. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडले. त्यानंतर आता ते पूर्ण करत आहेत त्यांना मानले पाहिजे, असे उर्मिला मार्तोंडकर म्हणाल्या.
सुनील शेट्टी-
मी मराठी चांगले बोलतो, पण हे सर्व जण बोलत असताना मी विसरलो, मी हिंदीमध्ये बोलतो. मी मागील काळापासून ठाण्यात येत होतो. ही महान व्यक्ती आहे, सर्वांकडून ऐकले त्यांचे काम संपणार नाही. त्यांच्यासारखे कोणच नाही..एकनाथ शिंदे हे स्टेजवर आल्यावर त्यांना वेगळी खुर्ची ठेवली होती. ती देखील काढायला त्यांनी सांगितले. सर्वांना मानसन्मान एकनाथ शिंदे देत असतात, मला बोलावले माझा सन्मान केला तुमचे आभार, असे सुनील शेट्टी म्हणाले.