ETV Bharat / city

राहुल गांधी म्हणतात गंगा अस्वच्छ, मग प्रियांकांनी पाणी कसे पिले - मनोज तिवारी - मनोज तिवारी

आता एक गोळी घरी चालली तरी बालाकोटपेक्षा पुढे जाऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला

मनोज तिवारी
author img

By

Published : Apr 16, 2019, 6:25 PM IST

ठाणे - राहुल गांधी म्हणतात गंगा अस्वच्छ आहे, मग प्रियंका गांधींनी गंगेचे पाणी कसे पिले, असा सवाल भाजप खासदार तथा प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांनी केला आहे. ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
खासदार तिवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. आता एक गोळी घरी चालली तरी बालाकोटपेक्षा पुढे जाऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला.

मनोज तिवारी
उत्तर भारतीयांच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू आहेत. त्यातून या भागाचा कायापालट होण्याबरोबरच लाखो तरुणांना नोकरी मिळेल, असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी भाषणात व्यक्त केला आहे.

यावेळी शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे , भाजपचे आमदार महेश चौगुले , शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने , भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील, गटनेता निलेश चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:राहुल गांधी म्हणतात गंगा मैला, मग प्रियंका गांधींनी गंगेचे पाणी पिलं कसं " .... खासदार मनोज तिवारी

ठाणे :- राहुल गांधी म्हणतात गंगा मैला, मग प्रियंका गांधींनी गंगेचे पाणी पिलं कसं " असा टोला राहुल गांधी यांना भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष व खासदार तथा प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता यांनी लगावला,
भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता, त्या मेळाव्यात खासदार मनोज तिवारी बोलत होते,

यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील , शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे , भाजपचे आमदार महेश चौगुले , शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने , भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी नगरसेवक सुमित पाटील, गटनेता निलेश चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्याला उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

खासदार तिवारी पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहे आता एक गोळी घरी चालली तर बालाकोट पेक्षा पुढे जाऊन कारवाई केली जाईल असा इशाराही तिवारी यांनी दिला. तर उत्तर भारतीयांच्या विकासासाठी आपण कायम कटिबद्ध आहोत, मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा योजना सुरू आहेत त्यातून या भागाचा कायापालट होण्याबरोबरच लाखो तरुणांना नोकरी मिळेल असा विश्वास खासदार कपिल पाटील यांनी भाषणात व्यक्त केला आहे

Conclusion:भिवंडी प्रचार सभा , खासदार मनोज तिवारी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.