ETV Bharat / city

Omicron Corona Variant : दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्याला सध्या कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात असलेल्या आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयातील विलागिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण आल्यापासून कोणाच्याही संपर्कात आलेला नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रतिभा पान पाटील यांनी दिली.

Omicron Variant
Omicron Variant
author img

By

Published : Nov 28, 2021, 11:50 PM IST

Updated : Nov 29, 2021, 12:36 PM IST

ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्याला सध्या कल्याण पश्चिम भागातील लाल चौकी परिसरात असलेल्या आर्ट गॅलरी येथील कोविड रुग्णालयातील विलागिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण आल्यापासून कोणाच्याही संपर्कात आलेला नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी प्रतिभा पान पाटील यांनी दिली.

रुग्णाला ओमिक्रॉनची लागण? -

या रुग्णाची कोरोना चाचणी 24 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्याने तत्काळ आपल्या नातेवाईकांना आपल्यापासून लांब राहावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेला कोरोना चाचणी अहवालातून हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून आल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाले असून तत्काळ या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये येऊन विलगीकरण करावे, अशी विनंती केली. सद्यस्थितीत या रुग्णाला कोरोनामध्ये बदल झालेला ओमीक्राँन विषाणूची लागण झाली आहे का? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पानपाटील यांनी 'ई टीव्ही भारत शी बोलताना सांगितले. तर नवीन विषाणू संदर्भात पालिका विभाग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबईत येणाऱ्या परदेशी पर्यटकांची होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी - महापौर
मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात येत असतानाच युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे (Covid New Variant) रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईमध्ये परदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मुंबईत नव्या व्हेरियंटचा प्रसार होऊ नये. यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome Sequencing Test) केली जाणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसेच नव्या व्हेरियंटचा (Covid New Variant) सामना करण्यासाठी सज्ज होऊ या, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

प्रत्येक प्रवाशाची जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट (Genome Sequencing Test) -
युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणूचा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट मुंबईमध्ये येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या माध्यमातून पसरू शकतो यामुळे महापालिका अलर्टवर आहे. नवा व्हेरियंटमुळे (Covid New Variant) चिंता वाढली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या पर्यटकांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार आहे. दक्षिण आफ्रिकेतील नवीन व्हेरियंटमुळे विमान सेवा नक्कीच बंद होणार नाही. मात्र परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट (Genome Sequencing Test) केली जाणार आहे. पालिकेने जिनोम सिक्वेन्सिंगवर भर दिला असून या चाचणीला सर पर्यटकांना समोरे जावे लागणार आहे असे महापौर म्हणाल्या.

अफ्रिकेतील विमानांवर मुंबईत बंदी घालण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
कोरोनाचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत ( Africa new Corona Variant ) आढळला असून आपल्या देशात या व्हेरियंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरियंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द ( Air Transport Cancellation Demand ) करा अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे मागणी केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी जालन्यात दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियम आणि अटी जाहिर केल्या आहेत.

कोरोनाच्या काळात राज्य सरकारचे पुन्हा नवीन निर्बंध, परराज्यातून येणाऱ्या प्रवाशाकरिता हे आहेत नियम
कोरोनाचा नवीन व्हेरियंट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवीन नियन व निर्बंध ( Maharashtra Govt issues fresh restrictions ) लागू केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या सर्व प्रवाशांना केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक ( RTPCR test for Maharashtra Journey ) असणार आहे.कोरोनाच्या काळात टॅक्सी, खासगी चारचाकीमधून प्रवास करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर चालक, वाहक व हेल्परला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ट्रान्सपोर्ट एजन्सीला 1 हजार रुपयांचा दंड ठोठावता येणार आहे.

नवीन विषाणूत 30 पेक्षा जास्त म्युटेशन, वेगाने पसरतो - डॉ. अविनाश भोंडवे
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार हा अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने म्हटले आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराला ग्रीक वर्णमालेनुसार 'ओमिक्रॉन' (New Covid Variant Omicron) असे नाव दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO on New Covid Variant Omicron) कोरोनाच्या या नव्या प्रकाराची घोषणा शुक्रवारी केली. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave on Omicron) यांनी माहिती दिली आहे.

Omicron Variant पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक...वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

Last Updated : Nov 29, 2021, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.