ठाणे - कोरोचाच संकट गेली दोन वर्ष संपुर्ण महाराष्ट्रासह जगावर होत. त्यामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम,सण किंवा उत्सव साजरे करता आले नाही. मात्र कोरोनाच सावट दूर झाल्याने आता सण आणि उत्सव मोठ्या धूम धड्याक्यात साजरे होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या दहीहंडी उत्सवानिमित्त ( Dahi Handi festival ) दहीहंडीची पंढरी समजली जाणाऱ्या ठाणे शहरात ठाण्यातील गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केलेली पाहायला मिळतेय, त्यातच महिला गोविंदा पथकांमध्ये ( Mahila Govinda Team ) देखील चांगलाच उत्साह पाहायला मिळतोय.
महिला गोंविदांचा सराव सुरू - दहीहंडी उत्सव ( Dahi Handi festival ) म्हटलं, कि ठाणे शहर हा नेहमीच चर्चेचा विषय बनतो. दरवर्षी लाखोंची बक्षीस ठाण्यातील दहीहंडी आयोजकांकडून ठेवण्यात येतात, मात्र गेली दोन वर्ष कोरोनाच सावट असल्याने हा उत्सव साजरा करता आला नव्हता. आता मात्र कोरोनाच संकट कमी झाल्याने, दहीहंडी सणावरील नियम व निर्बंध हटवल्याने यंदा हा उत्सव मोठ्या धुमधड्याक्यात साजरा होणार आहे. त्यासाठी सर्वच गोविंदा पथक देखील सज्ज झालेली आहेत. ठाण्यातील पुरुष गोविंदा पथकासह महिला गविंदा पथकांनी देखील कोरोनामुळे गेली दोन वर्ष गोविंदा पथकांमध्ये आलेली मरगळ झटकत सरावाला सुरुवात केली आहे.
७ थरांचा मानवी मनोरा - ठाण्यातील लक्ष्मी चिराग नगर भागातील संकल्प महिला गोविंदा हे ठाण्यातील पहिलं महिला गोविंदा पथक आहे. २००२ साली या गोविंदा पथकाची सुरुवात झाली असून यंदाचं या गोविंदा पथकाच विसावं वर्ष आहे. २०१४ साली याच संकल्प महिला गोविंदा पथकाने ७ थरांचा मानवी मनोरा रचून विक्रम केला व आपल्या गोविंदा पथकाच नावलौकिक मिळवलं. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यातुन दहीहंडी उत्सवानिमित्त या गोविंदा पथकाला आमंणत्रण येऊ लागलं आणि या पथकाने ठिकठिकाणी थर रचून सर्वांची मन जिंकली. या पथकामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व महिला व तरुणी उच्चशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी काम करणाऱ्या आहेत.
हेही वाचा - Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही'
सर्वकाही सांभाळून काररायत सराव - आपलं काम, घर, कुटुंब सांभाळून या महिला दररोज सरावाला येत असतात. पुरुषांप्रमाणे आम्ही देखील थर रचू शकतो, महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. हि जिद्द मनाशी बांधून निडरपणे या महिला मानवी थर रचत असतात. गेली दोन वर्ष हा सण साजरा करता आला नसला. तरी, तोच उत्साह मात्र या महिला गोविंदा पथकामध्ये कायम असलेला पाहायला मिळतोय. दरवर्षी आमच्या पथकात ४ ते ७५ वर्षांच्या महिला सहभागी होत. असतात मात्र न्यायालयाच्या नियमानुसार आम्ही यंदा १४ वर्षांवरील महिला गोविंदांना सहभागी करून घेतलं आहे. न्यायालयाचे सर्व नियम व अटी पाळूनच आम्ही हा उत्सव साजरा करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी जे निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे आणखील उत्साह यंदा आमच्यात असल्याच्या भावना या महिला गोविंदांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - Pune Crime News : ऐकावं ते नवलचं, 'पोपट वारंवार शिट्टी मारतो, त्यामुळे...'; पुणेकराने केली पोलिसांत तक्रार