ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : श्रीकांत शिदेंच्या कार्यालयाची तोडफोड; शाखा प्रमुखासह युवासैनिकांवर गुन्हा दाखल

श्रीकांत शिदेंच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली ( mp shrikant shinde office vandalism ) होती. त्याप्रकरणी 5 शाखाप्रमुख आणि युवासैनिकांनर उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले ( ulhasnagar police register fir against 5 shivsanik and yuvasainik ) आहे.

mp shrikant shinde office vandalism
mp shrikant shinde office vandalism
author img

By

Published : Jun 26, 2022, 4:00 PM IST

ठाणे - शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर शिवसैनिक कमालीचे संतप्त झाले आहेत. उल्हासनगर मधील गोल मैदान भागात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी शनिवारी ( 25 जून ) दुपारी फोडले ( mp shrikant shinde office vandalism ) होते. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ शाखा प्रमुखासह एका युवासेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले ( ulhasnagar police register fir against 5 shivsanik and yuvasainik ) आहे.

सुरेश पाटील (वय ४७, टिळकनगर शाखा प्रमुख), नितीन बोथ (वय,२७, वाल्मिकीनगर शाखा प्रमुख), उमेश पवार (वय ४१ , झुलेलाल चौक, शाखा प्रमुख), संतोष कणसे (वय ३९, फक्कडमंडी ,शाखा प्रमुख), लतेश पाटील (वय २५ शाखा प्रमुख ) आणि बाळा भगुरे (युवासेना पदाधिकारी ) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

ठाणे जिल्हा शिवनेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाणे जिल्हा शिवनेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि प्रमुख शिवसैनिकांच्या दोन बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्या. तर, मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले होते. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आता शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी ठाणे जिल्ह्यात आक्रमक प्रतिक्रिया दिसू लागल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी दुपारच्या सुमारास खासदार शिंदेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये आंदोलन - दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात आज ( 26 जून ) अंबरनाथ व उल्हासनगर मधील शेकडो शिवसैनिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. एकंदरीत शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष पाहता जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर, दुसरीकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील बंगल्यावर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा - Nana Patole : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरुन नाना पटोलेंचा भाजपला इशारा; म्हणाले, परिणाम भोगावे लागतील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.