ठाणे - बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( maharashtra political crisis ) यांना समर्थन करण्यासाठी ठाण्यात शिंदे समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन होत आहे. त्यात दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी उपाधी देत मोठे बॅनर उभारले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे 'महाराष्ट्राचे बाहुबली' असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता हे बॅनर आता सर्वांचे लक्षं वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे दक्षिण भारतीय ठाणेकरांनी हा बॅनर लावला आहे. त्यामुळे सर्वभाषीय नागरिकांचा एकनाथ शिंदेना पाठिंबा असल्याचे चित्र उभ राहिलं ( eknath shinde maharashtra bahubali banner in thane ) आहे.
एकनाथ शिंदेनी बंड केल्यापासून त्यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या गटाकडून दररोज विविध प्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांनी टेंभी नाका आणि शक्तीस्थळार जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये शिवसेना महिला आघाडी देखील आघाडीवर होत्या. आता शिवसेनेच्या दक्षिण विभागाने थेट बाहुबलीच्या प्रतिमेत एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उभारली असून, हे बॅनरच आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेरच लावण्यात आला आहे. यासंदर्भात अद्याप दक्षिण भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दक्षिण भारतीयांचा देखील पाठिंबा यानिमित्ताने जाहीर करण्यात आला असल्याचे स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा - Aaditya Thackeray : मुख्यमंत्री आजारी असताना षडयंत्र रचण्यात आलं; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर आरोप