ETV Bharat / city

रखडलेल्या पोलीस वसाहतीचा म्हाडा करणार पुनर्विकास; कर्मचाऱ्यांना मिळणार 567 सदनिका - pratap sarnaik latest news

वर्तकनगरमध्ये धोकादायक पोलीस वसाहतीत राहणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबांना आता सुरक्षित घरे मिळणार आहेत. येथील वसाहतीचा पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी केवळ एका बैठकीतून मार्गी काढला आहे.

म्हाडाची बैठक
म्हाडाची बैठक
author img

By

Published : Sep 15, 2020, 8:13 PM IST

ठाणे - गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तकनगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याचे आदेश आव्हाड यांनी दिले. या ठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत.

अनेक वर्षांपासून रखडलेला पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावल्याने आव्हाड यांनी सबंध पोलीस दलातून आव्हाड यांचे आभार मानले आहेत. म्हाडाने ठाणे पोलीस आयुक्तालयाला 1973 मध्ये 856 सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. परंतु त्यानंतर गेल्या 46 वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांचे कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. काही पोलीस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

हेही वाचा-जम्बो कोविड रुग्णालय उभारणे पराक्रम नाही, तज्ज्ञ डॉक्टरांचीही असते आवश्यकता - गणेश नाईक

फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समोर हा प्रश्न आल्यानंतर त्यांनी मंगळवारी गृहनिर्माण खात्याची तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी वर्तकनगरच्या पोलीस वसाहतीचे तत्काळ पुनर्वसन करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणार्‍या पोलिसांना हक्काची घरे मिळवून देण्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. त्यांचे हे प्रयत्न प्रत्यक्षात साकारले जाणार आहेत. या वसाहतीमध्ये निवृत्त पोलिसांनाही घरे मिळणार असल्याने पोलीस दलातून समाधान व्यक्त केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.