नवी मुंबई - रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर येथे असलेल्या इस्कॉन मंदिरामध्ये आज कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कृष्ण भक्तांनी भजन, कीर्तन गावून व नाचून आनंद व्यक्त करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला.
इस्कॉन मंदिरात उत्सव साजरा
जगभरात कृष्णाचा महिमा पोहचवण्यासाठी इस्कॉन मंदिरे उभारण्यात आली आहेत. यामधील काही मंदिरे भारतामध्येही आहेत. खारघर परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरामध्येही मोठ्या उत्साहाने कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला गेला. इस्कॉन मधील अनुयायी जगभर भगवतगीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करतात. श्रीकृष्णाचे जीवनचरित्र अद्भुत व रोमांचकारी असून तो विष्णूचा आठवा अवतार आहे असे मानले जाते. त्यामुळे इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमीचे विशेष महत्व असल्याने श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर गोकुळाष्टमीचे वेध लागतात. कृष्णाचा जन्मदिन झाल्यावर त्याचे पूजन तसेच कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कोरोनामुळे कृष्ण भक्तांनी हजेरी लावत कृष्ण जन्मोत्सव सोहळा पार पाडला.
हेही वाचा - अमित शाहांना हिंदूविरोधी ठरवणार का? संजय राऊतांचा भाजपला सवाल