ठाणे : कल्याण-मुरबाड-माळशेज महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाच्या ताफ्यात आता इंटर सेफ्टर या अत्याधुनिक वाहनाची भर पडली आहे. या वाहनात इंटर स्पीड गन, ब्रेथ लायझर ही उपकरणे उपलब्ध आहेत. यामुळे कल्याण-मुरबाड-माळशेज मार्गावरील अपघातांना आळा बसण्याची शक्यता महामार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - रहा सावध! कारण 'ते' चोरटे मूकबधीर असल्याच्या बहाण्याने करायचे घरफोडी
बारमाही माळशेज घाटाचे सौंदर्य निहाळ्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते. विशेषतः पावसाळ्यात या घाट मार्गावर मोठ मोठ्या डोंगरावरून येणाऱ्या धबधब्यावर चिंब भिजण्यासाठी हजारो पर्यटकांनी घाट मार्ग फुलून जातो. यामध्ये काही पर्यटक मद्यपान करून वाहन चालवणे, तसेच धबधब्याच्या ठिकाणी धिंगाणा घालणे, अशा प्रकारामुळे या काळात मोठे अपघात होत असतात. त्यातच माळशेज घाटातील महामार्ग धोकादायक वळणे, अरुंद रस्ता, अतिवेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहने चालविणे यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा - 'सैराट'ची पुनरावृत्ती; आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत बापानेच केले मुलीच्या शरीराचे तुकडे
कल्याण -मुरबाड - माळशेज महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलिसांना आता इंटर सेफ्टर वाहन पुरविण्यात आले आहे. यात अतिवेगाने असलेले वाहन ओळखण्यासाठी स्पीड गन, ब्रेथ लायझर अशी उपकरणे बसवण्यात आली आहेत. या इंटर सेफ्टर वाहनाचे आज महामार्ग पोलिसांनी मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या उपस्थितीत प्रात्याक्षिक घेतले, यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक ए.एन.सूर्यवंशी, पोलीस नाईक संजय घुडे, भांडे, मोरे उपस्थित होते.