ETV Bharat / city

अनधिकृत इमारतीच्या खांबाला तडे; सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला - शांतीनगर पोलीस ठाणे भिवंडी

शांतीनगर परिसरातील मोमीनपुरा येथे असलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीच्या खांबांना तडे गेल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाने संबंधित इमारत तत्काळ रिकामी केल्याने यामध्ये राहणाऱ्या 45 कुटुंबातील 300 नागरिकांना नवीन छत शोधण्याची वेळ आली आहे.

भिवंडीतील मोमीनपुरा येथे असलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीच्या खांबांना तडे गेले आहेत.
author img

By

Published : Aug 28, 2019, 12:53 PM IST

ठाणे - शांतीनगर परिसरातील मोमीनपुरा येथे असलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीच्या खांबांना तडे गेल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिका प्रशासनाने संबंधित इमारत तत्काळ रिकामी केली असल्याने यामध्ये राहणाऱ्या 45 कुटुंबातील 300 नागरिकांना नवीन छत शोधण्याची वेळ आली आहे.

भिवंडीतील मोमीनपुरा येथे असलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीच्या खांबांना तडे गेल्याने रहिवास्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सुमारे 15 वर्षांपूर्वी अय्याज मंजिल या नावाने ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. मंगळवारी(दि.२७ ऑगस्ट)ला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या तळमजल्यावरील एका खांबाचे प्लास्टर पडू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख ईश्वर आडेप यांना मिळताच ते पथकासह शांतीनगर पोलिसांनासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील सर्व नागरिकांना बाहेर काढून इमारत निर्मनुष्य केली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर सकाळी तज्ञ-अभियंते जावेद यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केल्यानंतर त्यांनी इमारतीचे नमुने घेऊन पुनर्लेखन अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा : भिवंडीत चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी

इमारत केवळ पंधरा वर्षे जुनी असू्न, मागील दोन वर्षांपूर्वी या इमारतीस महापालिकेने धोकादायक ठरवल्याची माहिती स्थानिक रहिवासी साजिद खान यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच यानंतर इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ठेकेदाराने योग्य दुरुस्ती न केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे त्यांनी सांगितले.

पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही घराबाहेर पडलो. परंतु आता राहायचे कुठे असा प्रश्न काश्मीरी बानो या महिलेने उपस्थित केला.

अनधिकृत इमारतींचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात शनिवारी मध्यरात्री पालिकेने धोकादायक ठरवलेली चार मजली अनधिकृत इमारत कोसळून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
आता शांतीनगर परिसरातील या घटनेनंतर अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Intro:

Body:अनधिकृत इमारतींच्या माहेरघरात , पुन्हा अनधिकृत चार मजली इमारतीच्या पिलरला तडे ; 300 नागरिक बेघर

ठाणे : अनधिकृत इमारतींचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात शनिवारी मध्यरात्री चार मजली अनधिकृत असलेली आणि पालिकेने धोकादायक ठरवलेली इमारत कोसळून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच शांतिनगर परिसरातील खान कंपाऊंड मोमीनपुरा परिसरात असलेली अनधिकृत चार मजली इमारतीच्या पिलरला तडे गेल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली . मात्र ही इमारत पालिका प्रशासनाने तात्काळ रिकामी करून यामध्ये राहणारी 45 कुटुंबातील 300 नागरिक बेघर झाली आहेत.
भिवंडीतील मोमीनपुरा खान कंपाऊंड याठिकाणी सुमारे 15 वर्षांपूर्वी अय्याज मंजिल या नावाने ही अनधिकृत इमारत उभी करण्यात आली, या इमारतीमध्ये एकूण 45 फ्लॅट्स असून त्यामध्ये सुमारे तीनशे नागरिक राहत होते, मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या तळमजल्यावरील एका पिल्लर चे प्लास्टर पडू लागल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, या घटनेची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख ईश्वर आडेप यांना मिळताच ते पथकासह शांतीनगर पोलिसांना घेऊन या इमारतीमधील सर्व कुटुंबियांना घराबाहेर काढून इमारत निर्मनुष्य केली, त्यानंतर सकाळी तज्ञ अभियंते जावेद आज मी यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केले असता त्यांनी काही इमारतीचे नमुने घेत पुनर्लेखन अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
येथील राहणारे रहिवाशी साजिद खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की इमारत केवळ पंधरा वर्षे जुनी असून मागील दोन वर्षापूर्वी या इमारतीस महापालिकेने धोकादायक ठरविल्यानंतर स्ट्रक्चर ऑडिट इमारतीचे करून घेत दुरुस्ती केली, मात्र ठेकेदाराने योग्य दुरुस्ती केली नसल्याने या इमारतीची पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे, तर काश्मीरी बानो या महिलेने पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही घराबाहेर पडलो परंतु आता राहायचे कुठे असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला असून ठेकेदाराने इमारत दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे सांगत आपणावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

दरम्यान घटनास्थळी पालिकेचे उपआयुक्त दीपक कुरलेकर आपत्कालीन व्यवस्थापन यांच्या पथकाने नागरिकांची समजूत काढून त्यांना घराबाहेर काढले, यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र या घटनेनंतर अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा शहरातील नागरिकांसाठी जटील समस्या होऊन बसला आहे ,मात्र त्यावर महापालिका प्रशासन नक्की काय उपाय योजना राबवते हे पाहणे गरजेचे आहे.

ftp fid ( 2vis)
mh_tha_2_bhiwandi_binding_crack_2_vis_mh_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.