ETV Bharat / city

Illegal Alcohol Confiscated : पोहे नेणाऱ्या टेम्पोतून अवैध दारूची तस्करी, दोघांना अटक; भिवंडी पोलिसांची कारवाई - भिवंडी अवैध दारू जप्त दोघांना अटक

गुजरातमधून मका पोहे घेऊन आलेल्या एका टेम्पोतून ( Illegal Alcohol Confiscated ) सुमारे ८ लाख ७४ हजार २०० रुपयांच्या विदेशी दारूचा साठा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ( Bhiwandi Crime Branch ) पकडला आहे. या दारूच्या साठ्यासह दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ( Two Arrest For Illegal Alcohol Transport ) दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Illegal Alcohol Confiscated
Illegal Alcohol Confiscated
author img

By

Published : May 28, 2022, 7:18 PM IST

ठाणे - गुजरातमधून मका पोहे घेऊन आलेल्या एका टेम्पोतून ( Illegal Alcohol Confiscated ) सुमारे ८ लाख ७४ हजार २०० रुपयांच्या विदेशी दारूचा साठा भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ( Bhiwandi Crime Branch ) पकडला आहे. या दारूच्या साठ्यासह दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ( Two Arrest For Illegal Alcohol Transport ) दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. रब्बी अहमद मोहम्मद रफी शेख व अविनाश अर्जून घाडीगांवकर (दोघे रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खबऱ्यामुळे विदेशी दारूची वाहतूक उघड - गुजरातमधून मोठ्याप्रमाणात गुटखा आणि विदेशी दारूची वाहतूक करून तो साठा मुंबईसह ठाणे जिल्ह्यात विक्री केला जात असल्याचे यापूर्वी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत उघड झाले आहे. त्यातच भिवंडी गुन्हे शाखेतील पोलिसांना गुजरात येथून मका पोहेच्या बॉक्स घेऊन निघालेल्या एका टेम्पोमधून दमण येथे विक्रीसाठी बनविलेली विदेशी दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मनीसुरत कंपाऊंड येथे शुक्रवारी सापळा रचला होता. त्याच सुमाराला त्या ठिकाणी आलेल्या टेम्पो क्रमांक MH 03 CV 2014 या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये दमण बनावटीच्या विदेशी ब्रँडच्या दारूच्या १ हजार ९४४ बाटल्या असलेले १०२ बॉक्स आढळून आले.

१६ लाख ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त - पोलिसांनी सुमारे ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची विक्रीसाठी अवैधरित्या आणलेली विदेशी दारू व टेम्पो, असा एकूण १६ लाख ८२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त दारू माफिया विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरु केला आहे.

हेही वाचा - PM Modi Gujarat Visit : बापूंच्या स्वप्नांचा भारत घडवित आहोत - नरेंद्र मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.