ETV Bharat / city

ठाण्यातील वागळे इस्टेटमधील बायोसेन्स कंपनीला भीषण आग, चार तासानंतर आग आटोक्यात

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या बायोसेन्स कंपनीला आणि प्रशांत स्वीट कॉर्नरच्या कंपनीलाही शुक्रवारी संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती, कि तब्बल साडे चार तास आग धूमसत होती. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

fire broke out at a biosense company
fire broke out at a biosense company
author img

By

Published : Jan 23, 2021, 12:11 AM IST

Updated : Jan 23, 2021, 12:40 AM IST

ठाणे - ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या बायोसेन्स कंपनीला आणि प्रशांत स्वीट कॉर्नरच्या कंपनीलाही शुक्रवारी संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती, कि तब्बल साडे चार तास आग धूमसत होती. अग्निशमन दलाचे पथक, ५ फायर इंजिन आणि १५ वॉटर टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु होते. रात्री ८ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणेला यश मिळाले. अवघा वागळे परिसरात आगीचे लोट येत होते. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वागळे इस्टेटमधील बायोसेन्स कंपनीला भीषण आग
वागळे इस्टेट परिसरातील बायोसेंन्स कंपनीत लागलेली आग हळूहळू भीषण होत गेली. तर याच कंपनीतील तीन विभागामध्ये आग पसरली. कंपनीत काम कर्मचाऱ्यांना बाहेर सुरक्षित काढण्यात यश लाभले असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर्वत्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरलेले होते. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे जवानांनी चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे टँकरसह खासगी पाण्याच्या टँकरचाही वापर करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली. तर केमिकल कंपनी असल्याने आग भडकत गेली.

ठाण्यात प्रसिद्ध प्रशांत कॉर्नरला झळ -

आग लागलेल्या बायोसेंन्स कंपनीत असलेल्या केमिकलने आग भडकली. तर या आगीची झळ बाजूलाच लागून असलेल्या प्रशांत कॉर्नरच्या गोदामालाही आग लागली. गोदामाचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर गोदामात असलेले सिलेंडर तातडीने बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. बायोसेन्स कंपनीत केमिकलने आग पकडली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

आगीच्या वाढत्या घटना -

ठाण्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यात आगीच्या वाढत्या घटना समोर येत आहेत. आठवड्यात ही तिसरी आगीची घटना असून पंधरवड्यात रस्त्यावर वाहने पेटवण्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. एका आठवड्यात २० जानेवारीला ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील स्वामीनारायण भवनाला आग लागली होती. ही आग रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागली होती. २१ जानेवारीला धर्मवीर नगरच्या इमारतीत एका घरात टीव्ही संचाचा स्फोट झाल्याने लागलेली आग भीषण नव्हती मात्र धुराचे लोळ उठल्याने खळबळ उडाली होती. तर १५० लोकांना इमारतीच्या खाली आणण्यात आले होते. तर शुक्रवारी बायोसेन्स कंपनीला आणि प्रशांत कॉर्नरच्या गोदामाला आग लागली.

Last Updated : Jan 23, 2021, 12:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.