ठाणे - प्रत्येक सामान्य नागरिकांच मुंबई-ठाणे सारख्या शहरात आपले स्वतःच हक्काचे घर असावे, असे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल आयुष्य खर्ची करतात. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात वर्षानुवर्षे चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना बीएसयुपी ( Basic Services to the Urban Poor ) योजनेअंतर्गत गगनचुंबी इमारतीत घर देण्याचे निश्चित करण्यात आले. बांधकाम सुरू असेपर्यंत त्यांना घरभाडेही मिळत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आता घरभाडे मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आधी चाळीच्या घरात राहून अनेक वर्ष संसार केला मग पालिकेच्या योजनेत चांगले घर मिळेल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांना आता हाती निराशा आली आहे. घराचे वाटप होऊनही ( Allotment ) घर ताब्यात मिळायला उशीर होत आहे. त्यामुळे टेकडी बंगला येथील रहिवासी हताश झाले आहेत. 7 वर्षांपूर्वी घरे तोडून ही योजना सुरू केली. मात्र, अजूनही घर मिळत नसल्याने आम्ही धुणीभांडी करून घर चालवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाडे भरून राहणे आम्हाला परवडत नाही. बीएसयूपी योजनेअंतर्गत दिलेल्या घराची अत्यंत दुरवस्था आहे. त्यामुळे आम्ही या घरात कसे राहणार, असा प्रश्न उपस्थित करत रहिवासी व्याकुळ झालेले आहेत. तसेच बीएसयूपी अंतर्गत आम्हाला चाळीतील घराच्या बदल्यात मिळालेल्या घराची राहायला येण्याआधीच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेली दुरवस्था पाहता आमची फसवणूक झाली आहे, अशी भावना येथील नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.
याच इमातारीला मिळाला आहे स्कॉच पुरस्कार - महाराष्ट्रातील बीएसयूपी योजनतेतील चांगले बांधकाम झाल्याचा पुरस्कार याच इमारतीला चार वर्षांपूर्वी मिळाला आहे. अशा अपूर्ण बांधकामाला पुरस्कार मिळत असतील तर यावर काय बोलणार, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
ठेकेदाराला मिळालेत केवळ 35 लाख - या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला आहे. मात्र, हे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला आतापर्यंत अवघे 35 लाख रुपयांचे बिल मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील 2 वर्षांपासून ठाणे महानगर पालिकेतील सर्वच ठेकेदारांना बिले 25 टक्के देण्यात आली आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता बांधकाम पूर्ण करून दुरुस्ती कामासाठी ही पैसे नसल्याचे ठेकेदार सांगत आहे.
हेही वाचा - Woman Dead Body in Sofa : विवाहितेची हत्या करून मृतदेह लपवला घरातील सोफ्यात; डोंबिवलीतील धक्कादायक घटना