ETV Bharat / city

Looting Bike and Mobile Thane: हौशीसाठी दुचाक्यासह मोबाईल लंपास करणारी सराईत गुन्हेगारांची चौकडी गजाआड, १६ गुन्हे उघडकीस

मौजमजेसाठी दुचाक्यासह मोबाईल पळविणाऱ्या सराईत चार गुन्हेगारांना शांतीनगर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या (Bike and Mobile Thief arrest Thane) आहेत. तर या सराईत गुन्हेगारांकडून आतापर्यत १६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येऊन ८ लाखांच्यावर मुद्देमाल हस्तगत कऱण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस (Bhiwandi Police Action) उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. (Four arrested for looting bikes)

Looting Bike and Mobile Thane
Looting Bike and Mobile Thane
author img

By

Published : Oct 3, 2022, 5:05 PM IST

ठाणे : मौजमजेसाठी दुचाक्यासह मोबाईल पळविणाऱ्या सराईत चार गुन्हेगारांना शांतीनगर पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या (Bike and Mobile Thief arrest Thane) आहेत. तर या सराईत गुन्हेगारांकडून आतापर्यत १६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश येऊन ८ लाखांच्यावर मुद्देमाल हस्तगत कऱण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस (Bhiwandi Police Action) उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे (वय 20 रा. लहुजीनगर,कल्याण), आयाज अली रेहमतअली अन्सारी (वय 38 रा. चिरागनगर, घाटकोपर), दाऊद शोएब अन्सारी (वय 28, रा. गुलजार नगर, भिवंडी), सर्फराज रेहमतअली खान (वय 26, रा. भिवंडी) असे बेड्या ठोकलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. (Four arrested for looting bikes)

भिवंडीत मोबाइल व दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

चोरांच्या शोधार्थ विशेष पोलीस पथके स्थापन- भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही मोठ्या संख्येने दुचाक्या व मोबाईल पळविण्याच्या घटना घडत होत्या. या घटना रोखण्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली. वाहन चोरी, मोबाईल चोरी आणि चैन स्नॅचिंगच्या दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असताना या पथकाने सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे, आयाज अली रेहमतअली अन्सारी, दाऊद शोएब अन्सारी, सर्फराज रेहमतअली खान या चार जणांना विविध ठिकाणावरून सापळा रचत बेड्या ठोकल्या.

चोरीच्या मोबाइलची नेपाळमध्ये विक्री- अटक गुन्हेगारांकडून आतापर्यंत 11 दुचाकी, 1 रिक्षा, दोन सोन्याच्या चैन व 23 चोरीचे मोबाईल असा एकूण 8 लाख 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चौकडीने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13, शहर पोलीस ठाण्यातील 2, नारपोली पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 16 चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. विशेष म्हणजे, चोरीचे हे सर्व मोबाईल नेपाळ या ठिकाणी विक्रीसाठी पाठविले जात असताना जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.