ETV Bharat / city

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात.. ठाणे जिल्हा प्रशासनाची हेल्पलाईन सेवा - कोरोनामुळे अनाथ झालेल्यांसाठी हेल्पलाईन सेवा

कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. ठाणे जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बलकांना मायेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कठीण प्रसंगी त्यासाठी 'सेव्ह द चिल्ड्रन' यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष तयार केला असून हेल्पलाईन नंबर सेवा सुरू केली आहे.

thane-district-administration-helpline-service

author img

By

Published : May 26, 2021, 7:59 PM IST

ठाणे - कोरोनाने अनेकांचे जीवन उधवस्त केलंय. अनेकांना आपल्या प्रियजनांचा विरह सहन करावा लागला आहे. या महामारीत अनेक मुलं ही अनाथ झाली आहेत. आई- वडील दोघांचेही निधन झाल्याने घरात बाळाला, बालकांना पहायलाही कुणी नाही. नातेवाईकांनीही साथ सोडली. अशावेळी ठाणे जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करत, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बलकांना मायेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कठीण प्रसंगी त्यासाठी 'सेव्ह द चिल्ड्रन' यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष तयार केला असून हेल्पलाईन नंबर सेवा सुरू केली आहे.

जवळपास गेली दीड वर्षे कोरोनामुळे काही मुलांना अनाथ होण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले. तुम्हला नोकरी किंवा उद्योगधंदे परत मिळू शकतात परंतु आई वडील कसे परत मिळतील, त्याहीपेक्षा आम्हाला सांभाळणार कोण ? आम्हचे काय होणार? हा मोठा प्रश्न या अनाथ मुलांच्या समोर आहे. या कोरोनाच्या भयाण परिस्थितीमध्ये कोणीही मदतीचा हाथ पुढे करणार नाही. आई- वडील दोघांचेही निधन झाल्याने घरात बाळाला, बालकांना पहायला कुणीच नाही. नातेवाईकांनीही साथ सोडली. अशावेळी ठाणे जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करत कोरोनामुळे अनाथ झालेल्या बलकांना मायेचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा कठीण प्रसंगी त्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने कक्ष तयार केला असून 830899222, 7400015518 हेल्पलाईन सुरू केली आहे. तान्हुल्या बाळापासून ते जाणत्या बालकांपर्यंतच्या अनाथांना पालकत्व मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा फार्स वाढत असून कुठे बापलेक तर कुठे मायलेक एकाच वेळी मृत्युमुखी पडल्याच्या घटनाही अलीकडे घडल्या. मात्र दुर्दैवाने जर कोरोनामुळे आई- वडिलांचा मृत्यू झाला आणि घरी बाळ, बालके असतील तर पुढे काय, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा बालकांना दत्तक देण्याची योजना सुरू असल्याच्या अफवाही यामुळे उठल्या आहेत. त्यामुळे आणखीनच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या अशा अफवांवर विश्वास ठेवू नये उलट जिल्हा प्रशासनाशी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महिला व बाळ विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
कशी असणार कार्यवाही -
हेल्पलाईनवर मदतीसाठी फोन आल्यास महिला व बालविकास विभागातर्फे पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या विभागातील अधिकारी कर्मचारी सर्वप्रथम त्या कुटुंबाला किंवा बालकांना भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतील. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून त्यांना बाळांना साभांळण्याची विनंती करतील. जे पालकत्व घेण्यास तयार होतील त्यांची सर्व माहिती कागदपत्रे घेऊन त्यांना शासनाच्या योजनेनुसार दरमहा दोन हजारांचा भत्ता दिला जाईल. पण जर त्या बालकांना कुणीच सांभाळण्यास तयार नसेल तर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन त्यांची जबाबदारी घेणार. बाळ जर तान्हुले असेल किव्हा १ ते पाच वर्षांपर्यंत असेल तर शिशूसंगोपन केंद्रामध्ये त्याला ठेवण्यात येईल. त्यातूनही जर त्यांना दत्तक घेण्यासाठी कुणी पुढाकार घेतला तर शासनाच्या नियम-अटीनुसारच सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जर बालके पाच वर्षापुढील असेल तर त्यांना बालसंगोपन केंद्रात ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेश गायकवाड यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.