ETV Bharat / city

धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या २० वर्षीय नराधमाचा ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार - sexually abused

पीडितेवरील झालेला प्रकार उघडकीस येताच पीडितेच्या आईने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून पीडितेवरील घडलेला प्रसंग कथन करताच पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या नराधमावर भादवी ३७६ (अ) (ब), ३४२, २०१ या कलमसह पोक्सो कायदा कलम ४ आणि ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी नराधम फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी सुप्रिया जाधव करीत आहेत.

file photo
file photo
author img

By

Published : Nov 16, 2021, 9:15 AM IST

ठाणे - शेजार धर्माला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारीच राहणाऱ्या एका २० वर्षीय नराधमाने ५ वर्षीय चिमुरडीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार (girl sexually abused) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात (Shantinagar Police Thane) बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत (Pokso Act) गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी नराधमाचा शोध सुरु केला आहे.

पीडितेला अंघोळ घालताना धक्कादायक प्रकार आला समोर -

पीडित चिमुरडी कुटूंबासह भिवंडीतील रामनगर भागातील एका चाळीत राहते. तर आरोपी नराधमही तिच्या शेजारी राहत असून तो एका लूममध्ये कामगार म्हणून काम करतो. त्यातच काल (रविवारी ) सकाळच्या सुमारास पीडिता घरासमोरील अंगणात खेळत होती. त्यावेळी तिला बाहण्याने बोलवून आरोपी त्याच्या घरात घेऊन गेला. त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने पीडित अल्पवयीन मुलगी घरी आल्यानंतर आईला अंघोळ घालण्यासाठी तिने सांगितले. मात्र आईने त्याकडे लक्ष दिले नसल्याने पीडित मुलगी पुन्हा घराबाहेर गेली आणि अर्ध्या तासाने पुन्हा घरी आली. त्यावेळीही आईला अंघोळ घालण्यासाठी तिने पुन्हा सांगितले. त्यामुळे आईने तिला अंघोळ घालत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम फरार -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.