ठाणे - मोठ मोठ्या आजारांना सामोरे जाणारे रुग्ण आपले हात टेकतात, मात्र कॅन्सर ( Fighting with cancer Divya Pavle success ) सारख्या गंभीर आणि भयंकर आजाराशी झुंज देत ( Divya Pavle success 10 result ) ठाण्यातील दिव्या पवळे हिने दहावीत घवघवीत यश संपादन केले. जिद्द, चिकाटी आणि कॅन्सरसारख्या अजारला हरवत दिव्याने हे मोठ यश संपादन केले.
हेही वाचा - Vegetable Rates : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी व तोंडलीचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर
दहावीची सुरवात आणि मधेच आलेला कॅन्सर यामुळे वर्षभर अभ्यासाचा पत्ताच नाही. सुरवातीला काही दिवस ऑनलाईन शिक्षण घेतल, मात्र वर्षभर कॅन्सरच्या उपचारामुळे अभ्यासात व्यत्यय येत होता, त्यामुळे वर्षभर अभ्यास न करून परीक्षेच्या आधी अभ्यासात जुंपून घेऊन परीक्षा दिली आणि हे यश संपादन केले, असे कॅन्सरग्रस्त दिव्याचे म्हणणे आहे.
सुरवातीचा काळ फार कठीण होता. कॅन्सर किंवा टिबी असा डॉक्टरांचा समज होता आणि कॅन्सर आजाराचे निदान झाले. प्रत्येक हॉस्पिटलमधे वेगवेगळे उपचार सुरू केले. दहावीपेक्षा तिचे बर होणे महत्वाचे होते आणि म्हणून आम्ही तिला दहावीत ड्रॉप घ्यायचा सल्ला दिला. मात्र तिने जिद्दीने दहावीची परीक्षा दिली आणि हे यश संपादन केले, असे दिव्याच्या वडिलांनी सांगितले.
दिव्याला लिहायला त्रास होत होता, तरी देखील जिद्दीने तिने अभ्यास केला आणि परीक्षा दिली. तिला एवढे टक्के पडतील यावर विश्वास देखील बसत नाही. कारण, प्रतेकवेळी अभ्यासात आजारपणामुळे तिला त्रास होत होता. मात्र, तरीसुद्धा हे यश संपादन केले. आम्हाला तिचा अभिमान आहे, असे दिव्याच्या आईचे म्हणणे आहे. आपल्याकडील दुखांना कवटाळण्यापेक्षा दुखांवर मात करण्याचा आदर्श दिव्याने सर्वांना दिला आहे.
हेही वाचा - Bail to Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर; तरीही 21 जूनपर्यंत मुक्काम तुरुंगातच