ETV Bharat / city

ठाण्यात प्रसिद्ध झाली 'मोफत रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स' तरुणांची संकल्पना - cororna patients

वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यानेही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशी ओरड कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेतही ऐकू येत आहे. ठाण्यातील तरुण मुलांनी यावर रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स उपाय शोधून काढला आहे. ठाण्यातील जवळपास ८० तरुणांनी एकत्र येऊन समाज रक्षक पोलीस मित्र संघटनेच्या अंतर्गत मोफत रिक्षा ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध केली.

रिक्षा ॲम्बुलन्स
रिक्षा ॲम्बुलन्स
author img

By

Published : May 13, 2021, 9:04 PM IST

ठाणे - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. यामध्ये वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्यानेही अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशी ओरड कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेतही ऐकू येत आहे. ठाण्यातील तरुण मुलांनी यावर रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स उपाय शोधून काढला आहे. ठाण्यातील जवळपास ८० तरुणांनी एकत्र येऊन समाज रक्षक पोलीस मित्र संघटनेच्या अंतर्गत मोफत रिक्षा ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध केली. या रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्सने शेकडो रुग्णांचे जीव वाचवले आहेत.

'मोफत रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स' तरुणांची संकल्पना

मोफत रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा

अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून अनेकांना उशिरा उपचार मिळतात. काही ठिकाणी तर वेळेवर रुग्णांना ॲम्बुलन्स न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशी घटना ठाणेकरांसोबत घडू नये, या करता जवळपास ८० तरुणांनी एकत्र येऊन समाज रक्षक पोलीस मित्र संघटनेच्या अंतर्गत मोफत रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध केली आहे. पहिल्या लाटेतही या पोलीस मित्र तरुणांनी अडीचशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांना कोविड सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटरपर्यंत सुखरूप सोडले आहे. तर या दुसऱ्या कोरोना लाटेतही आतापर्यंत अनेक ठाणेकरांना रिक्षा ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एकूण 80 लोकांची टीम

समाजरक्षक पोलीस मित्र तरुणांच्या कामाचे फक्त ठाण्यातच नाही तर, राज्यात इतर ठिकाणी देखील कौतुक केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात आपली आर्थिक बाजू ढासळलेली असताना देखील या समाजरक्षक पोलीस मित्र तरुणांनी मोफत रिक्षा ॲम्बुलन्स सेवा देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. एकूण 80 लोकांची ही टीम असून, सात रिक्षा आहेत ज्या संपूर्ण ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांना मोफत रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा पुरवतात, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आपली घरची आर्थिक बाजू सांभाळत, कोणत्याही राजकीय पक्ष, राजकीय नेता, सामाजिक संस्था कोणाचीही मदत न घेता या समाजरक्षक पोलीस मित्र तरुणांनी आपली ॲम्बुलन्स सेवा अविरत सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाताना, हे समाजरक्षक पोलीस मित्र आपली देखील चांगली काळजी घेतात. पूर्ण पीपीई किट घालून हे समाजरक्षक पोलीस मित्र रिक्षाचालक कोरोना रुग्णांना सेवा देतात. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाला सेवा दिल्यानंतर संपूर्ण रिक्षा पूर्ण सॅनिटाइज करून पुन्हा इतर कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याकरता सज्ज होतात.

पक्ष संगठना सोडून लोकांसाठी काम
खरंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांना मोफत रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा देणारे, हे 80 तरुण विविध पक्षातील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत पण असे असूनही हे सामाजिक कार्य करताना एकही तरुण राजकारण आणत नाहीत आणि याच एकीमुळे हे 80 तरुण ठाणेकरांना या महामारीच्या काळात देखील सुविधा देत आहे. या तरुणांची सुरू असलेल्या या सामाजिक कार्याचे अनेकांनी कौतुक केले असलं तरी यांना कोणीही आर्थिक मदत करत नाही आणि अशी अपेक्षाही या तरुणांना नाही परंतु रिक्षा अ‍ॅम्ब्युलन्स सेवेसाठी लागणारे पेट्रोल किंवा रिक्षा मेंटेनन्ससाठी जर समाजातील कोणी दानशुर व्यक्ती पुढे आला तर ही सेवा नक्कीच अखंडित सुरु राहील, अशी प्रतिक्रिया समाजरक्षक पोलीस मित्र रिक्षाचालकांनी दिली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा

हेही वाचा - 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.