ठाणे : (Thane District) भिवंडीत कारखान्याची (Factory building collapsed) पुन्हा एक मजली धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. हि घटना पांजरा पोळ (Panjra Pol area) परिसरात निशाण हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद सरकार (वय 25) मोहम्मद ( वय 25), मोहम्मद जाकीर (वय 26), मोहम्मद जहांगीर (वय 26) असे जखमींची नावे आहे. यापैकी मोहम्मद जहांगीर याची प्रकृती चितांजनक असल्याचे सांगण्यात आले.
इमारत कोसळून बाजूच्या खोलीवर पडली : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील पांजरा पोळ परिसरात, निशाण हॉटेलच्या पाठीमागे तळ अधिक एक मजल्याचा लूमचा कारखाना आहे. या कारखान्याची इमारत अत्यंत धोकादायक असल्याने ती रिकामी करण्यात आली होती. मात्र ही धोकादायक इमारत आज सकाळच्या सुमारास कोसळली. यामुळे त्याच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये एक व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्याचबरोबर या घटनेत आणखी तीन व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. या तिघांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला असल्याने त्याला सिराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
हेही वाचा : धक्कादायक! वाहनाचा वेग कमी करताना दुचाकीला पाठीमागून कंटेनरची धडक; पुण्यात बापलेकीचा मृत्यू