ETV Bharat / city

Banana Trunks Rakhi: बनाना फायबरपासून राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या राख्या; पालघर महिला बचत गटाचा उपक्रम - Rakhis Made From Banana Trunks

पालघर मधील वाडा तालुक्यातील ( Palghar Wada Taluka ) तुसे या गावातील महिला बचत गटाने ( Womens Self Help Group Palghar )पर्यावरण पोषक असणाऱ्या केळीच्या खोडापासून म्हणजे ,बनाना फायबर ( Banana fiber ) पासून राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या राख्या तयार केल्या आहेत. तर या महिला बचत गटाने तयार केलेले सर्व राख्या देशाच्या वेगवेगळ्या सीमांवर रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत .

Environmentally Friendly Rakhis
केळीच्या खोडापासून बनवलेल्या राख्या
author img

By

Published : Aug 8, 2022, 5:13 PM IST

Updated : Aug 8, 2022, 7:36 PM IST

पालघर - पालघर मधील वाडा तालुक्यातील ( Palghar Wada Taluka ) तुसे या गावातील महिला बचत गटाने ( Womens Self Help Group Palghar ) पर्यावरण पोषक असणाऱ्या केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर ( Banana fiber ) पासून राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या राख्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व राख्या देशाच्या वेगवेगळ्या सीमा भागात रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.

महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार देखील उपलब्ध - आझादी का अमृत महोत्सवचं ( Azadi Ka Amrit Mahotsav ) औचित्य साधत पालघर मधील वाडा तुसे येथील समर्थ ग्रामसंघाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या बचत गटाकडून हा अनोखा उपक्रम केला जात आहे. आता पर्यंत या बचत गटाला सत्तर हजार राख्यांची ऑर्डर मिळाली आहे. केळीच्या खोडापासून म्हणजे बनाना फायबर पासून अत्यंत बारीक काम करून या सुबक राख्या तयार करण्यात आल्या असून या राख्यांना दिलेल्या तिरंग्याच्या रंगामुळे या राख्या आणखी आकर्षक झाल्या आहेत. बनाना फायबर पासून तयार केल्या जाणाऱ्या या राख्यांना बनवण्यासाठी जवळपास 50 रुपये इतका खर्च येत असून या राख्या मुंबई , ठाणे शहरातही आता उपलब्ध होणार आहेत. या सगळ्यातुन पर्यावरण पूरक राख्या ( Environmental Supplement Rakhi )तर तयार होत आहेत. शिवाय स्वयंरोजगारावर उभ्या राहू पाहणाऱ्या महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार देखील उपलब्ध होतआहे.

हेही वाचा : Chocolate Rakhi : यंदा भावासाठी घेऊया चॉकलेट राखी; पुण्यात 'येथे' मिळते ही राखी

Last Updated : Aug 8, 2022, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.