ETV Bharat / city

प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर.. - Pratap sarnaik ED raid

प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर ईडीचे छापे सुरू आहेत. ही कारवाई योग्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, तर ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.

Maharashtra: Enforcement Directorate officials conducted raids on residences and  offices of Shivsena MLA pratap Sarnaik
प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर..
author img

By

Published : Nov 24, 2020, 1:30 PM IST

Updated : Nov 24, 2020, 5:28 PM IST

ठाणे - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज पहाटेच ईडीचे छापे पडले. त्यांच्या ठाण्यातील घरांसह, मुंबईतील घरे आणि कार्यालयांवरही ईडीच्या पथकांचे छापे टाकण्यात आले. आज पहाटे सहा वाजेपासूनच ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई योग्य असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, तर ही कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकरांनी येत्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळणार असून, राज्यात भाजपची सत्ता येईल अशी वक्तव्ये केली होती. त्यानंतर ईडीने ही छापेमारी सुरू केल्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचा छापा; शिवसेनेचे आणखी नेते रडारवर..

घर आणि कार्यालयावरही छापे..

आज सुरू असलेल्या कारवाईत प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातल्या दोन घरांवर, कार्यालयावर तसेच त्यांच्या मुंबईतील घरांवरही ईडीचे पथक छापे मारले. ठाण्यातील त्यांची दोन घरे वसन लॉन्स आणि हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये आहेत. याशिवाय त्यांच्या देव कॉर्पोरा ठिकाणी कार्यालय आहे, ज्या ठिकाणी छापे पडले आहेत.

दरम्यान, सध्या प्रताप सरनाईक हे मुंबईत आपल्या निवासस्थानी नसून, परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे.

विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात..

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या ईडी कार्यालयात आणण्यात आले आहे. ठाण्याच्या हिरानंदानी येथील निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. विहंग सरनाईक हे प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ चिरंजिव असून, त्यांच्या लहान मुलाचे नाव पूर्वेश सरनाईक असे आहे. विहंग यांच्या नावाने विहंग कन्स्ट्रक्शन हा त्यांचा व्यवसाय चालतो, तर पूर्वेश हे युवा सेनेचे सचिव आहेत. ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेट मधील त्यांच्या घरातून विहंग यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दिल्लीचे पथक..

आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी करण्यात आलेली कारवाई ही ईडी च्या दिल्लीच्या पथकाने केली आहे. या पथकासोबत सीआरपीएफचे पथक देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.

आणखी नेते रडारवर..

प्रताप सरनाईक यांच्यासोबत आणखी सेना नेतेही ईडीच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. सध्या मुंबईत दहा ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांवर ईडीचा छापा पडू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ईडची सूडबुद्धीनं छापेमारी -संजय राऊत

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यावर सूडबुद्धीनं छापेमारी सुरू आहे. अटक करायची असेल तर अटक करून टाका. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. ही नामर्दानगी आहे. थेट समोर येऊन लढा. शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका. हे उद्योग एक दिवस तुमच्यावरच उलटतील असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. केंदीय तपास यंत्रणांचा वापर करून हे सरकार दबावाखाली येईल असं कुणाला वाटत असेल तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. सी बी आय, ईडी काही असू द्या आम्ही सर्व कुणालाही शरण जाणार नाहीत. लढत राहू हे सरकार पुढे 25 वर्षे कायम राहील. एजन्सी चा वापर करून जे सरकारवर दबाव आणू पाहत आहेत त्यांनी लक्षात घ्यावे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. ही काळ्या दगडावरची रेघ की तूमचे सरकार येईल हे स्वप्न विसरून जा. तुम्ही सुरुवात केलीय. शेवट कसा करायचा हे आम्हाला माहीत आहे.

प्रताप सरनाईक काही साधुसंत नाही -नारायण राणे

प्रताप सरनाईक हा काही साधुसंत नाही, असे मत भाजपा खासदार नारायण राणे यांनी सरनाईक यांच्यावर पडलेल्या ईडीच्या छाप्याबाबत बोलताना व्यक्त केले. कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्याशिवाय याबाबत बोलणं उचित ठरणार नाही. सध्या ही कायदेशीर बाब आहे. यंत्रणा तपास करत आहेत. एकदा काय खरे काय खोटे हे स्पष्ट झाल्यावर त्यावर मत मांडता येईल, असेही नारायण राणे म्हणाले.

ईडीच्या छाप्याचे स्वागत - किरीट सोमय्या

मुंबई - प्रताप सरनाईक त्यांची कंपनी मनी लॉनडरिंग करत असतील तर त्यांच्यावर ईडीचे छापे पडले असतील तर त्याचे स्वागत करायला पाहिजे, असे मत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे नेते महापालिकेतील माफिया कंत्राटदारांकडून पैसे घेतात हे जगजाहीर आहे. त्यांचा मुखियाही... असे म्हणत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया संपवली आहे.

ईडीच्या कारवाईचे संजय निरुपम यांनी केले स्वागत

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आज अंमलबजावणी संचालनालय (इडीने) छापे मारून सुरू केलेल्या कारवाईचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी स्वागत केले आहे. मागील दशकापासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती गोळा केलेली आहे त्यामुळे त्यांच्या आमदारांची सुद्धा चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र ही चौकशी कुठल्याही राजकीय द्वेषातून झाली होऊ नये, असेही ते म्हणाले आहेत.

कोण आहेत प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्धा जिल्ह्यात झाला. बालपणीच वर्धा जिल्ह्यातून मुंबईला स्थायिक झाले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. डोंबिवलीच्या एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ रिक्षा चालवली. १९९७ साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेऊन राजकारणात उडी मारली. १९९७ मध्ये ठाणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. २००८ मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. २००९ मध्ये ते आमदार झाले. ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते तिनदा आमदारपदी निवडून आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात त्यांनी १२५ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता दाखवली होती.

दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश राजकारणात

प्रताप सरनाईकांना दोन मुलं आहेत. यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग तर धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे जवळचे संबंधत आहेत. पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. तर युवासेनेच्या कामांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होतात. तर पूर्वेश यांच्या पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे अनेक रहिवासी प्रकल्प विहंग ग्रुपच्या माध्यमातून ठाणे शहरात उभारण्यात आले आहेत. ठाण्याच्या घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे.

...म्हणून ते केंद्रात असलेली शक्ती वापरत आहेत - शरद पवार

लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकार सरकारी संस्थाचा वापर विरोधकांच्या विरोधात करतंय. हे योग्य नाही. आमच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांना माहितीये की, ते येथे सत्तेवर येऊ शकत नाहीत. म्हणून ते केंद्रात असलेली शक्ती वापरत आहेत.

हेही वाचा : सत्तास्थापनेचा मुहूर्त नाही; पण हे सरकार पडल्यावर सक्षम पर्याय देऊ - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Nov 24, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.