ETV Bharat / city

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकांचे निकाल जाहीर; महाविकासआघाडी आणि भाजपला बसला फटका - मुंबई धान्य बाजार

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 29 फेब्रुवारीला पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकांचे निकाल जाहीर

author img

By

Published : Mar 3, 2020, 3:05 AM IST

नवी मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २९ फेब्रुवारी पार पडली होती. संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर तब्बल 6 वर्षांनी या निवडणूका घेण्यात आल्या. यामध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर सोमवारी निवडणुकांचे निकाल हाती आले असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी कर्मचारी माथाडी मापाडी यांच्यात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकांचे निकाल जाहीर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 29 फेब्रुवारीला पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोगही आजमावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप व शिवसेना यांनी आपले पॅनल बनविले होते, तर भाजपही या निवडणुकीत आपली स्वतंत्र भूमिका घेऊन सहभागी झाले होते. मात्र पाचही बाजारातील व्यापारी प्रतिनिधी कोणत्याही पॅनल मध्ये सहभागी झाले नव्हते. फळबाजारमधील निवडणूक बिनविरोध पार पडल्याने संजय पानसरे यांना कौल देण्यात आला. मात्र, कांदा बटाटा बाजारात पूर्व संचालक अशोक वाळुंज आणि कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्यात चुरशीची लढत होती. मात्र, शेळके यांना मात देत अशोक वाळूंज हे विजयी झाले आहेत.

भाजीपाला बाजारात चार उमेदवार उभे होते, यात माजी संचालक शंकर पिंगळें आणि के. डी. मोरे यांच्यात चुरशीची लढत होती. मात्र, चारही उमेदवारांना मात देत 996 मते मिळवून शंकर पिंगळे हे विजयी झाले आहेत.

हेही वाचा- प्रेम न करण्याची शपथ घेतलेल्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचा 'प्रेमविवाह'

मसाला बाजारात माजी संचालक कीर्ती राणा व अशोक राणावत यांच्यात चुरस रंगली होती. या दोघांनाही मात देत अनपेक्षितपणे 312 मते मिळवून विजय वनमालिदास भुता हे विजयी झाले आहेत.अन्नधान्य बाजारात 412 मत मिळवून नीलेश रमणीकलाल विरा हे विजयी झाले आहेत. संचालक मंडळाच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्या नंतर कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास पोलिसांनी मज्जाव केला असल्याने बाजार समितीमध्ये शांतता पाहायला मिळाली.

उमेदवार आणि निकाल -

कांदा बटाटा बाजार -

अशोक देवराम वाळुंज - विजयी
सुरेश रामचंद्र शिंदे
राजेंद्र काशिनाथ शेळके

भाजीपाला बाजार -

शंकर लक्ष्मन पिंगळे - विजयी
प्रताप नामदेव चव्हाण
विठ्ठल अश्रू बडदे
काशिनाथ दिनकर मोरे

धान्य बाजार -

निलेश रमनिकलाल वीरा - विजयी
लक्ष्मण वेलजी भानूशाली
पोपटलाल केशरमल भंडारी

मसाला बाजार -

विजय वनमालीदास भुता - विजयी
अशोक उमरावचंद राणावत
कीर्ती अमृतलाल राणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.