ETV Bharat / city

ED attached Pratap Sarnaik assets : ईडीकडून प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त - प्रताप सरनाईक 11 कोटी संपत्ती जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांची ११.३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडीने सरनाईक यांची ही मालमत्ता जप्त केली आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रताप सरनाईक आणिि त्यांच्या मुलाची ईडीकडून चौकशी सुरू होती.

pratap sarnaik assets
प्रताप सरनाईक संपत्ती जप्त
author img

By

Published : Mar 25, 2022, 5:38 PM IST

Updated : Mar 25, 2022, 6:33 PM IST

ठाणे - शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळ्यातील मालमत्तांची रक्कम 11.35 कोटी (ED attached assets worth Rs 11.35 crore) आहे, ज्यामध्ये मनी लॉ़ड्रिंग प्रतिबंधाच्या तरतुदींनुसार ठाणे येथे 2 फ्लॅट आणि जमीन जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण NSEL फसवणुकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये सुमारे 13 हजार गुंतवणूकदारांच्या 5600 कोटी रुपयांच्या विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग झाला होता.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

मागील अनेक दिवसांपासून सुरू होती चौकशी : प्रताप सरनाईक यांची मागील अनेक दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीच्या दरम्यान त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आलेली होती. ही चौकशी सुरू असताना हीरानंदनी इस्टेटमधील याच घरी अनेकदा अधिकारी येऊन गेले होते. राहते घर आणि मिरा रोड येथील व्यावसायिक जागा या दोन्ही जप्त केलेल्या आहेत. जवळपास 11 कोटी 35 लाख रुपयांच्या बाजारमूल्याच्या या दोन्ही वास्तु ईडीने आज जप्त केल्या आहेत. या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी स्वतःहून याबाबत माहिती देखील दिली आहे.

Last Updated : Mar 25, 2022, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.