ठाणे - बनावट बंदुका बनवून त्या ठाणे, मुंबई आणि आसपासच्या परिसरात विकणाऱ्या दुकलीला ठाणे शहर पोलिसांनी गजाआड ( Duplicate Gun Making Gang ) केले आहे. त्यांच्याकडून एकूण 11 देशी बनावटीच्या बंदुका, गोळ्या आणि बंदुका बनविण्याचे सामान जप्त ( 11 country made guns seized in Thane ) केले आहे.
घरातच अत्यंत कल्पकतेने दस्त्यावाल्या लांब नळीच्या देशी बनावटीच्या बंदुका तयार करण्यात ( country made guns home production ) येत होत्या. त्या अत्यंत स्वस्त दरात विकणाऱ्या व्यक्तीची गुप्त माहिती कासारवडवली पोलीस स्थानकाच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी ( Kasarwadwali PI Rajesh Babshetti ) यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून 42 वर्षीय दयानंद भडांगे उर्फ नवश्या याला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी करून मूळ उत्तर प्रदेश येथील व सध्या वालीव वसई येथे राहणारा त्याचा साथीदार चंद्रदेव सरोज याला अटक केली. दोघांच्या घर आणि अंगझडतीत पोलिसांना एकूण दहा देशी बनावटीच्या बंदुका सापडल्या आहेत. त्याचबरोबर 11 काडतूस आणि बंदुका बनविण्याचे साहित्य असे एकूण 53,400 रुपयांची माल जप्त करण्यात आली.
हेही वाचा-Narayan Rane Critics on Sanjay Raut : संजय राऊत यांना घाम का फुटत होता - नारायण राणे
अवैध शिकार करणाऱ्यांना बंदुकीची विक्री-
केवळ पाच हजार रुपयात जंगली जनावरांची अवैध शिकार करणाऱ्यांना आरोपी बंदुका विकत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली. या बंदुका कोणाला विकल्या आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. या बंदुका शिकारीसाठी जरी विकत असले तरी माणसाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे हे गंभीर प्रकरणआहे. त्यामुळे बंदुक खरेदी करणाऱ्यांचा शोध गांभीर्याने घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा-Bappi Lahiri passes away : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन